Dictionaries | References क करतलामलक Script: Devanagari See also: करतलामल Meaning Related Words करतलामलक A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Used of any thing on which, from the clearness and cogency of the evidence it bears, dispute seems impossible. Corresponding to "Like the sun at noonday." करतलामलक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि/क्रिवि . ( हातांत प्रत्यक्ष स्थित असलेला आवळा जसा सर्व बाजूंनी पाहतां येतो त्याप्रमाणें ) सिद्ध ; स्पष्ट ; उघड ; ज्याचें सर्व बाजूंनीं ज्ञान झालें आहे असें ; ज्यास दुसरें प्रमाणाची गरज नाहीं . असें . असंशयित ' ' वेदशास्त्राचा मथितार्थ । झाला करतलामलकवत । ' - एभा ११ . १०४९ . ' ते करतलामलकसे दुरूनि दिसले अशेष मग तीतें । ' - मोस्त्री ४ . ३ . ( ल .) अवगत असलेली ; हातचा मळ बनलेली ; अत्यंत सुलभ ; साध्य ( विद्या , कला शास्त्र वगैरे ). ' चतुर्दश विद्या चौसष्ट कला । करतळामळ जयासी सकळा । ' - ह ३१ . ८ ' महाराष्ट्र व संस्कृत या दोन्हीं भाषा मोरोपंताला करतलामल होत्या ' - नि ७६५ . स्वाधीन ; सुगम . ' सारा भूगोल ज्यास करतलामलकवत् आहे त्यास एखाद्या रानांत नेऊन सोडला किंवा त्याच्या हातीं जहाजाचें सुकाणूं दिलें तर काय मौज होईल बरें !' - नि . ( कर + तल + आमलक ) करतलामलक मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 [ कर + तल + आमलक + वत् = हाताच्या तळव्यातील आवळ्याप्रमाणें ]. १. हातांत प्रत्यक्ष असलेला आवळा जसा सर्व बाजूंनी पाहिजे तसा पाहतां येतो त्याप्रमाणें, जयाचे सर्व बाजूंनी स्पष्ट ज्ञान झाले आहे असाज्यास दुसर्या बाह्य प्रमाणाची जरूर नाही असा. ‘वेदशास्त्राचा मथितार्थ। झाला करतलामलकवत्।’- एभा ११.१०४९. २. पूर्णपणे अवगत असलेलीअगदी हातचा मळ बनलेलीअत्यंत सुलभ (विद्या, कला, शास्त्र वगैरे). ‘चतुर्दशविद्या चौसष्ट कला। करतळामळ जयासी सकळा।’ -ह ३१.‘महाराष्ट्र व संस्कृत या दोन्ही भाषा मोरोपंताला करतलामल होत्या.’ - नि ७६५. करतलामलक A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 कर—तलामलक n. n. ‘a myrobalan lying in the hand’, anything quite clear to all eyes. ROOTS:कर तलामलक Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP