|
न. तरवारीची अष्टांगे . - १ अंग . २ रूप . ३ जाति . ४ नेत्र . ५ अरिष्ट . ६ भुमि . ७ ध्वनि . ८ परिमाण . पु. शरीराचीं आठ अंगें :- दोन हात , उर , कपाळ , दोन नेत्र , ग्रीवा , कटि ; दुसरा पर्याय - दोन हात , उर , भाल , दोन पाय , दोन गुडघे ; तिसरा पर्याय - दोन हात , दोन पाय , दोन गुडघे , वाचा , मन ; चौथा पर्याय - हात , पाय , गुडघे , छाती , मस्तक , दृष्टि , मन , वाणी . - एभा २० . २९१ ( सामा . ) सर्व शरीर ; सबंध देह . अष्टांगीं पहा . आरोग्यता तुका पावला अष्टांगीं । - तुगा ३९५८ . अष्टविध समाधि पहा . अष्टांग अभ्यासिला योगु तेणें । - ज्ञा ९ . ४२२ . आठपट . वैद्यकशास्त्राचे आठ भाग :- शल्य , शालाक्य , कायचिकित्सा , भूतविद्या , कौमारभृत्य , अगदतंत्र , रसायनतंत्र , वाजीकरणतंत्र . स्मृतीची अष्टांगें :- कायदा , न्यायाधीश , पंच , लेखक , ज्योतिष , सोनें , अग्नि , पाणी . पुजेंची अष्टांगें :- पाणी , दूध , तूप , दहीं , दर्भ , तांदूळ , जव , सर्षप . मैथुनाचीं अष्टांगें :- स्मरण , कीर्तन , क्रीडा , दर्शन , गुह्यभाषण , चिंतन , निश्चय , संयोग . बुध्दीचीं अष्टांगें :- शुश्रूषा , श्रवण , ग्रहण , धारण , चिंतन , ऊहापोह , अर्थविज्ञान , तत्त्वज्ञान . ०नमन पात प्रणाम - न . पु . हात , पाय , गुडघे , वक्षस्थल , मस्तक , दृष्टि , मन व वाणी हीं आठ अंगें जमीनीवर टेकून नमस्कार करणें . अतिशय आदरार्थी नम्रतापूर्वक नमस्कार . - एभा २० . २९१ . ०योग अष्टविध समाधि पहा . येक सांगती अष्टांगयोग । नाना चक्रें ॥ - दा ५ . ४ . २४ . ०लवण न. पादेलोण , ओवा , आमसुलें , आम्लवेतस हीं एकएक भाग , दालचिनी , वेलदोडे व मिर्यें हीं अर्धा भाग व साखर सर्वांच्या बरोबर घालून केलेलें चूर्ण . हें अग्निदीपक आहे . ०साधन अष्टविध समाधि पहा . योगी करिती अष्टांगसाधन । त्यांसीही नव्हे ऐसें दर्शन । - ह ८ . १८२ . [ सं . ]
|