वि. - एक संख्याविशेष ; १८ .
- ( सांकेतिक ) पुराणें ( मुख्य पुराणांची संख्या १८ आहे ). कृष्ण वर्णुनियां श्रेष्ठ । चौघे गर्जताती भाट । अठरा मागध उध्दट । वंशावळी वर्णिती ॥ - एरुस्व ६ . ७६ . तो हा पंढरीचा राणा । पुसा सहा चौं अठरां जणां ॥ - तुगा २५३९ . [ सं . अष्टादशन ; प्रा . अट्ठदह , अट्ठारस - ह ; हिं . अठारह ; पं . अठारां ; बं . आठार ; उ . अठर ; गु . अढार ; सिं . अडहं ].
०अखाडे अखाडा पहा .
०उपधान्यें अव. न. सजगुरा , भादली , वरी , नाचणी , बरग , कांग , खपले गहूं , मका , करडई , राजगिरा , मटकी पावटा , मूग , वाल , कारळा , देवभात , सातू , अंबाडी . ( दुसरी गणना ) सजगुरा , नाचणी , वरी , मका , मटकी , राजगिरा , शिरस , पांढरफळी , जिरें , मेथी , वेणुबीज , देवभात , कमलबीज , पाकड , अंबाडी ; भेंडीबीज , गोवारी , कुड्याचें बीज , यांमध्यें कोठें कोठें खसखस व पांढरा राळा घालून ही संख्या विसावर नेण्यांत येते .
०उपपुराणें उपपुराणें पहा .
०उपजाती, उपयाती अव . स्त्री . अठरापगड जातींप्रमाणें ज्या अठरा उपजाती आहेत त्या अशा ; भिल्ल , कोळी , मांग , अंत्यज , चांडाळ , पुल्कस , जिनगर , सलतानगर , चर्मक , डोहर ( ढोर ), भाट , बुरुड , रजक , दांगट , मोचेकरी , खाटिक लोणारी व कैकाडी . - स्वादि ६ . ५ . ३७ - ३८ .
०कचेरी स्त्री. ( म्है . ) राज्यकारभारांतील सर्व वरिष्ठ खातीं असणारी मोठी कचेरी ; सेक्रेटॅरिएट .
०कारखाने अव. पु. - राज्यकारभारांतील खातीं : ( अ ) उष्टर , खबुतर , जनान , जवाहीर , जामदार , जिकीर , तालीम , तोफ , थट्टी , दफ्तर , दारु , दिवान , नगार , पील , फरास , बंदी , मोदी व शिकार हे अठरा कारखाने . ( आ ) तोप , पील , उष्टर , फरास , शिकार , रथ , जामदार , जवाहीर , जिराईत , नगार , दारु , वैद्य , लकड , इमारती , मुदबख , कुणबिणी , खाजगत , थट्टी . ( इ ) खजीना , दफ्तर , जामदार , पील , जिराईत , अंबर , फरास , मुदबख , नगार , सरबत , आबदार , शिकार , तालीम , दारु , उष्टर , बकरे , तोप , सराफ . या तीन व आणखीहि कित्येक निरनिराळ्या याद्या सांपडतात . हे सर्व कारखाने सरकारी असून त्यांवर स्वतंत्र अधिकारी असत . सर्वांवर खानगी कारभारी मुख्य असे . त्याच्या अठरा कारखान्यांच्या गेल्या कळा । - ऐपो १४२ .
- ( ल . ) मोठ्या संसाराच्या किंवा व्यवहाराच्या शाखाखातीं . [ अठरा + फा . कार्खाना ].
०खूम न. लोकांच्या अठरा जाती . सर्व प्रकारचे लोक ; अठरापगड जात . या गांवांत एक मुकादम नाहीं , अठरा खुमाचे अठरा वेगळाले आहेत ; शिवाय - भाअ १८३४ . ४७ . [ अर० कौम ; फा . खूम = जात , ].
०गुणांचा खंडोबा पु . - ( ल . ) सर्व ( दुर ) गुणांनीं भरलेला ; लुच्चा किंवा लबाड इसम ; अट्टल सोदा . सोळा गुणांच्यावर कडी - जसा नाशिककर हा काशीकरापेक्षां शंभर पटीनें वरचढ तसा हा
- अक्षयी रोगी ; दुखणेकरी ; अनेक रोगांनीं - दु : खांनीं व्याप्त .
०जाती स्त्री. अव . कुंभार , तेली , कासार , तांबोळी , न्हावी , परीट , कलाल , कोष्टी , झारा ( झारेकरी ), महार ( चांभार ), जैन , जती , दुंडे , गुजर , मारवाडी , सोनार , सुतार , हलालखोर ( कसाब ). - कोको . अठरापगड जाती पहा .
०टोपकर, टोपीकर हिंदुस्तानांत आलेले युरोपियन आपल्या निरनिराळ्या देशरिवाजांप्रमाणें टोप्या वापरीत ; तेव्हां त्यांना टोपकर असें नांव पडलें . १८ प्रकारचे ( युरोपियन ) टोपकर ; १ फिरंगी ( पोर्तुगीज ); २ वलंदेज ( हालंड - डच ); ३ निविशयान ( नार्वेजियन ); ४ यप्रदोर ?; ५ ग्रेंग ( ग्रीक ); रखतार ? ; ७ लतियान ( लाटिन ); ८ यहुदिन ( ज्यू ); ९ इंगरे ( इंग्रज ); १० फरासीस ( फ्रेंच ); ११ कसनत्यान ( शेटलंडियन केल्टिक ? ); १२ विनेज ( व्हेनेशियन ); १३ दिनमार्क ( डेन्मार्क ); १४ उरुस ( आयरिश किंवा रशियन ); १५ रुमियान ( रुमानियन किंवा रोमन ); १६ तलियान ( इटालियन ); १७ सुवेस ( स्विस ); १८ प्रेमरयान ( पोमेरॅनियन ). - भाइ १८३५ . दुसरी एक यादी - फिरंगी इंग्लिश , फ्रान्सीस , सिंध , पावलिस्त , क्रिस्त , ब्रम्हेय , डौन , द्रुप , क्राज , सुस्त , नाग , जर्मिनी , कालील , बांक , चीन , युवरेर , दौंडी . - कोको . यांत नुसते युरोपियन येत नसून हिंदुस्तानाबाहेरील चिनी वगैरेहि लोक येतात . वडिलांची अठराटोपीकरावर सलाबत आहे . - विवि . ८ . ३ . ५५ .
०तत्त्वें न. अव . महान ( बुध्दि ), अहंकार , मन , दहा इंद्रियें आणि पंचतन्मात्रें - गीर १८५ .
०धान्यें न. मुख्य धान्यें - गहूं , साळ , तूर , जव , जोंधळा , वाटाणा , लाख , चणा , जवस , मसूर , मूग , राळा , तीळ , हरीक , कुळीथ , सावा , उडीद , चवळी .
०धान्यांचें कडबोळें न . - (भाजणी - अठरा धान्यें भाजून केलेल्या पिठाचा एक खाद्य पदार्थ ).
- ( ल . ) निरनिराळ्या प्रकारच्या गोष्टींचें मिश्रण .
- अनौरस अपत्य ; जारज .
- भिन्न जातींचा संकर ; संकरजात ; संकर जातींतील व्यक्ति .
०पगडजात स्त्री. - तांबट , पाथरवट , लोहार , सुतार , सोनार , कासार , कुंभार , देवळक ( गुरव ), धनगर , गौळी , लाडवाणी , जैन , कोष्टी , साळी , चितारी , माळी , तेली , रंगारी . - स्वादि ६ . ५ . ३५ - ३६ . जशी युरोपियनांत टोप्यांची - अठरा टोपकर - तशी हिंदु लोकांची पगड्या बांधण्याची तर्हा जातीजातींत वेगळी आहे ; तेव्हां जितक्या जाती तितके पगड्यांचे प्रकार ; यावरुन सर्व जाती किंवा जातींचे लोक ; एकूणएक लोक
- अव्यवास्थित ; मिश्र जनसमूह ; नाना धर्मांचा जमाव . या यात्रेंत अठरापगड जात मिळाली आहे , तेथें सोंवळें काय पुसतां ? [ अठरा + पगडी किंवा पगडा = फाशावरील संख्यावाचक चिन्ह ]
०पद्में अव . पु . तरुणांचा जमाव , टोळी , सैन्य ; वानरसेना . ( रामाला मदत करणारीं १८ पद्में वानरें होतीं ).
वानर - पु . अव . तरुणांचा जमाव , टोळी , सैन्य ; वानरसेना . ( रामाला मदत करणारीं १८ पद्में वानरें होतीं ).
०पर्वे न. अव . महाभारताचीं मुख्य प्रकरणें : - आदि , सभा , वन , विराट , उद्योग , भीष्म , द्रोण , कर्ण , शल्य , सौप्तिक , स्त्री , शांति , अनुशासन , अश्वमेघ , आश्रमवासी , मौसल , महाप्रस्थानक व स्वर्गारोहण .
०पर्वे - न . ( ल . ) मोठी कंटाळवाणी गोष्ट ; लांबलचक , जींत अनेक भारुडें व दु : खप्रसंग भरले आहेत असें कथन ; चर्हाट .
भारत - न . ( ल . ) मोठी कंटाळवाणी गोष्ट ; लांबलचक , जींत अनेक भारुडें व दु : खप्रसंग भरले आहेत असें कथन ; चर्हाट .
०पुराणें पुराणें पहा .
०बाबू लबाड किंवा लुच्च्या लोकांची टोळी ; आळशी लोकांचा कंपू ; अव्यवस्थित लोकांचें मंडळ ; बारभाई . ( हल्लीं ) कारकून वर्ग . बाबू पहा . [ बं . हिं . बाबू = राजेश्री ; समान्य ; आंइं . इंग्रजी लिहिणारा हिंदु कारकून ].
०भार - स्त्री . पृथ्वीवरील सर्व वृक्ष - वनस्पति यांचा समुदाय . अठराभार वनस्पतींची लेखणी । - व्यं ३१ .
वनस्पति - स्त्री . पृथ्वीवरील सर्व वृक्ष - वनस्पति यांचा समुदाय . अठराभार वनस्पतींची लेखणी । - व्यं ३१ .
०वर्ण पु. अव . अठरा ( पगड ) जाती . यांची एक याद अशी : ब्राह्मण , क्षत्रिय , वैश्य , शूद्र , कुंभार , गवळी , तेली , पांचाल ( सोनार , सुतार , लोहार , तांबट , पाथरवट , हे पांच मिळून ), कोष्टी , रंगारी , शिंपी , न्हावी , पारधी , महार , धनगर , परीट , मांग व चांभार .
०विसवे विश्वे )- वि . अतिशय ; बहुतेक परिपूर्ण ; जास्त प्रमाणाचें . विश्वा , विसवा पहा . [ अठरा विसांश ; वीस विसवांचा एक रुक्का , अठरा विसवे म्हणजे दोन विसवा कमी इतकें ; बहुतेक पूर्ण ]
( विश्वे )- वि . अतिशय ; बहुतेक परिपूर्ण ; जास्त प्रमाणाचें . विश्वा , विसवा पहा . [ अठरा विसांश ; वीस विसवांचा एक रुक्का , अठरा विसवे म्हणजे दोन विसवा कमी इतकें ; बहुतेक पूर्ण ]
०दारिद्र्य दरिद्र )- न . अतिशय गरिबी . त्याच्या घरीं अठरा विश्वे दरिद्र आहे . अठराविश्वे दरिद्र पाणी वाहतें .
( दरिद्र )- न . अतिशय गरिबी . त्याच्या घरीं अठरा विश्वे दरिद्र आहे . अठराविश्वे दरिद्र पाणी वाहतें .
०विश्वे पापपुण्य चौकशी , मूर्ख , धर्म , रोग इ० वाक्यप्रचार .