|
एक एकटेपण (एकत्व) दर्शविणारा किंवा एका भागाचा अंतर्भाव दर्शविणारा, उपसर्ग u.axial एखाक्ष एकच अक्ष (दांडा) असलेला, उदा. फुलोरा u. carpellate एककिंज एकच किंजदलाचे (फळ, किंजपुट) उदा. वाटाण्याची शिंबा (शेंग) u. cellular एककोशिक एकाच शरीरघटकांचे (कोशिका, पेशी) बनलेले. u. costate एकसिराल एकच मध्यशीर असलेले (पान, उदा. आंबा, केळ). u. cotyledonous एकदलिकित एकच दलिका असलेले (बीज किंवा गर्भ, वनस्पती) u. cus एकाकी, एकटे u. florous एकपुष्पी एकच फुल येणारे उदा. झेफिर लिलीचा फुलोरा किंवा तत्सम वनस्पती. u. foliate एकपर्णी, एकदली एकच दल असलेले संयुक्त पान, उदा. लिंबू, संत्र इ. u. foliolate एकदली u. folius एकपर्णी एकच पान असलेले (खोड किंवा वनस्पती) उदा. ऑफिओग्लॉसम (नेचा). u. formis एकाकृति एकाच आकाराची (नलिकाकृति किंवा जिव्हिकाकृति) फुले असण्याचा प्रकार, उदा. सूर्यफूल कुलातील काही वनस्पती (झेंडू, मखमल, सहदेवी, ओसाडी, सालीट, बम्हदंडी, सँटोनिन, दवणा इ.) u. lateral एकपार्श्विक सर्व अवयव (शाखा, पाने, फुले) एकाच बाजूस वळलेले किंवा उगम पावलेले. u. locular (one celled) एकपुटक एकच कप्पा असलेले (पराग, किंजपुट) u. nucleate एकप्रदली कोशिकेतील जीवद्रव्यात एकच प्रकल असलेला (प्राकल) u. on युति, संघटना केसरदले, तंतू, परागकोश, किंजदले इत्यादी (वनस्पतींच्या) अवयवांचे अंशतः किंवा पूर्णपणे जुळून वाढणे पहा adhesion, cohesion. u. parous cyme एकपद (एकशाख) वल्लरी फुलोऱ्याच्या अक्षाची फूल येऊन वाढ खुंटल्यावर एकच नवीन अक्ष (व त्यावर) दरवेळी एक फूल येऊन फुलोरा बनणे. पहा helicoid, scorpioid u. petalous एकप्रदला एकच पाकळीचा पुष्पमुकुट असलेले (फूल). u. septate एकपटीय एकच पडदा असलेले (बीजुक) u. seriate एकस्तरित, एकश्रेणीबद्ध एका उभ्या रांगेत किंवा आडव्या थरात असलेले. u. sexual एकलिंगी फक्त केसरदले किंवा किंजदले असलेले (फूल) फक्त रेतुकाशये किंवा अंदुककलश असलेला (गंतुकधारी) एकाच लिंगाची गंतुके (प्रजोत्पादक घटक) प्रसवणारा (कायक, उदा. शैवले, कवक, शेवाळी इ.)
|