|
कदली गण, सिटॅमिनी केळ, कर्दळ, आले इत्यादी एकदलिकित वनस्पतींचा गण. यामध्ये आराट कुल, कर्दळ कुल, कदली व शुण्ठी गण (झिंजिबरेलीझ) म्हटले आहे. बेसींच्या पद्धतीत याच गणाला इरिडेलीझ असे नाव देऊन त्यामध्ये अननस कुल व मुसळी कुल यांचाही समावेश केला आहे. वेखंड, वेलची, हळद इत्यादींचाही अंतर्भाव शुण्ठी कुलात केला जातो. विभागी एकसमात्र फुले, संवर्त व पुष्पमुकुट भिन्न, केसरमंडलात ऱ्हास, वंध्यकेसर पाकळ्यासारखे, अधःस्थ किंजपुटात तीन कप्पे व बियांत परिपुष्क ही लक्षणे या गणात आढळतात. cannaceae, Marantaceae, Musaceae, Zingiberaceae.
|