|
कदली (रंभा) कुल, म्यूझेसी केळ (कदली) रॅव्हॅनेला, हेलिकोनिया (ंजंगली केळ) चवेणी इत्यादी एकदलिकित वनस्पतींचे लहान कुल. याचा अंतर्भाव हल्ली कदली गणात (सिटॅमिनी) करतात. परंतु हचिन्सन शुंठी (झिंजिरेलीझ) गणात करतात. प्रमुख लक्षणे- मोठ्या नरम (काष्ठ नसलेल्या) मिथ्या खोडाच्या वनस्पती, महाछद्रयुक्त संयुक्त फुलोरा, द्विलिंगी किंवा एकलिंगी, एकसमात्र, सम किंवा विषम प्रकारची परिदले असलेली फुले, बहुधा जुळलेल्या तीन परिदलांची दोन वर्तुळे, तीन केसरदले फलनक्षम व दोन वंध्य, तीन जुळलेल्या किंजदलांच्या अधःस्थ किंजपुटात तीन कप्पे व प्रत्येकात एक किंवा अनेक बीजके, मृदुफळ किंवा बोंडात सपुष्क व परिपुष्कयुक्त बिया Scitamineae
|