|
पाषाणभेदकुल, सॅक्सिफॅगेसी गूजबेरी, पाषाणभेद (हिं. पाखानभेद) बसक इत्यादी द्विदलिकित फुलझाडांचे एक कुल, याचा अंतर्भाव गुलाब गणात केला जातो. हचिन्सन यांनी पाषाणभेद गणात (सॅक्सिफॅगेलिझमध्ये) केला आहे. एकूण वंश तीस व जाती सुमारे सहाशे (रेंडल- ऐंशी वंश व अकराशे जाती) प्रसार - विशेषेकरून समशीतोष्ण व उष्णकटिबंधातील डोंगराळ प्रदेश. प्रमुख लक्षणे- औषधी, क्षुपे व वृक्ष, पाने एकाआड एक, फुलोरे विविध, फुले नियमित, द्विलिंगी, मंडलित, पंचभागी, क्वचित पाकळ्या नसतात. केसरदले पाचाच्या दोन मंडळात असून बाहेरचे मंडळ पाकळ्यासमोर असते. किंजदले बहुधा दोन, ऊर्ध्वस्थ किंवा अधःस्थ किंजपुट, अनेक बीजके मध्यवर्ती, अक्षाला चिकटलेली, मृदुफळात किंवा बोंडात अनेक सपुष्क बीजे. Rosales.
|