|
जनक, पुनरुत्पादक, प्रजोत्पादक नवीन संतती निर्माण होण्यात भाग घेणारा (अवयव किंवा कोशिका) उदा. बीज, बीजुक, गंतुक, रंदुक इ.) r.bud कलिका, मुकुलिका प्रजोत्पादक अवयव निर्मिणारी कळी (फुलाची कळी, पुष्पकलिका) प्रजा (संतती) निर्माण करणारी सूक्ष्म संरचना (उपांग, अवयव, कंदिका इ.) r.cell जनन कोशिका संतती निर्माण करण्याची क्षमता असलेला शरीरातील सर्वात लहान घटक, उदा. गंतुक, बीजुक, रंदुक, विबीजुक इ. पहा gamete r.organ जननेंद्रिय, जनक अवयव प्रजोत्पादनात प्रत्यक्ष भाग घेणारा किंवा तत्सम काय निर्माण करणारा व विशेषत्व पावलेला अवयव, उदा. अंदुकाशय, अंदुककलश, केसरदल, किंजदल, धानी, गदाकोशिका इ.इ. r.phase जननावस्था प्रजोत्पादनाची अवस्था r.shoot जनन प्ररोह प्ररोहाच्या दोन प्रकारांपैकी प्रजोत्पादक अवयव असलेला भाग, शंकू, फूल इ. पहा vegetative r.system जनन तंत्र (व्यूह) प्रजोत्पादनात भाग घेणाऱ्या सर्व अवयवांचा व्यूह (संस्था) अथवा संच.
|