|
सूक्ष्म-, लघु-, अल्प- अतिलहान या अर्थी उपसर्ग. m. aplanospore सूक्ष्म अचरबीजुक अति लहान व हालचाल न करणारे बीजुक (प्रजोत्पादक अलिंगी कोशिका). उदा. शैवले, काही कवक m. biology सूक्ष्मजीवविज्ञान विषाणू, सूक्ष्मजंतू, सूक्ष्मजीव यासंबंधीची ज्ञानशाखा m. biotic सूक्ष्मजैव सूक्ष्म जीवासंबंधी m. body सूक्ष्मकाय अति लहान कण m. conidium लघुविबीजुक पहा conidium m. cyst लघुकोष्ठ पहा cyst. m. fibril सूक्ष्मसूत्रक अत्यंत सूक्ष्म धागा m. flora सूक्ष्मपादपजात विशिष्ट स्थानी आढळणारा अतिलहान वनस्पतींचा समूह किंवा त्यांचे वर्णन m. fossil सूक्ष्मजीवाश्म अत्यंत लहान जीवांचे भूस्तरातील अवशेष, उदा. करंडक वनस्पती, काही मृदुकाय प्राणी m. fungi लघुकवक लहान हरितद्रव्यहीन वनस्पती, पहा fungi m. gamete सूक्ष्मगंतुक दोन गंतुकांपैकी (प्रजोत्पादक लैंगिक कोशिकापैकी) लहान (बहुधा नर) m. gametophyte सूक्ष्म गंतुकधारी, लघुयुग्मकोभ्दिद, सूक्ष्म पुं-गंतुकधारी पुं-(नर) गंतुके निर्मिणारी अतिलहान पिढी, उदा. सिलाजिनेला m. meter सूक्ष्ममापक सूक्ष्मदर्शी यंत्रातून सूक्ष्म पदार्थांची (उदा. स्टार्चकण, स्फटिक, वनस्पती व प्राणी आणि त्यांचे भाग इ.) लांबी, रुंदी, व्यास इ. मोजण्याचे साधन (काचपट्टी) छादनी किंवा नेत्रभिंग पहा eyepiece m. nucleus लघुप्रकल, सूक्ष्मप्रकल कोशिकेतील (सूक्ष्म प्राणी किंवा वनस्पतीतील) बहुधा दोन प्रकलांपैकी लहान प्रकल, प्रकलांच्या खंडनामुळे स्वतंत्र झालेल्या शकला (खंडा)पैकी एक. m. organism सूक्ष्मजीव फक्त सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने दिसू शकणारे अत्यंत लहान सजीव (प्राणी, वनस्पती, सूक्ष्म जंतू) m. parasite सूक्ष्मजीवोपजीवी अत्यंत लहान व दुसऱ्या जीवावर उपजीविका करणारा सजीव, उदा. काही सूक्ष्मजंतू, आदिजीव इ. m. phanerophyte लघुबीजीवृक्ष, लघुवृक्ष सुमारे ते मी. उंचीचे क्षुप किंवा लहान वृक्ष m. photograph सूक्ष्म छायाचित्र अत्यंत लहान वस्तूचे छायाचित्र m. phyll लघुपर्ण लहान पान, उदा. Pilea microphylla (L.) Liebm. m. phyllous लघुपर्णी लहान पाने असलेली (वनस्पती) उदा. सिलाजिनेला, लायकोपोडियम इ. m. phylly लघुपर्णता लहान पाने असण्याचा प्रकार m. phyte सूक्ष्म (लघु) पादप उदा. सूक्ष्म जंतू, शैवले m. phytic formation सूक्ष्मपादप समावास फक्त सूक्ष्म वनस्पतींचा नैसर्गिक समुदाय m. pylar बीजकरंध-, बीजांडद्वार-, बीजांडद्वारीय m. pyle बीजकरंध, बीजांडद्वार बीजकातील प्रदेहाच्या टोकावरील लहान भोक, बीज रुजताना ह्या छिद्रातून पाणी शोषले जाते व मोड (आदिमूळ) प्रथम बाहेर येतो. m. scope सूक्ष्मदर्शक, सूक्ष्मदर्श सूक्ष्म वस्तंउचे निरीक्षण करून त्यासंबंधीचे तपशील समजून घेण्यास उपयुक्त असे यांत्रिक साधन m. scopic सूक्ष्म, सूक्ष्मदर्शीय m. scopy सूक्ष्मदर्शिकी सूक्ष्मदर्शकासंबंधाची समग्र माहिती (संरचना, उपयोग, वापरण्याची पद्धत, निरीक्षणाकरिता आवश्यक ते प्राणी वा वनस्पती यांवर करण्याचे संस्कार इत्यादी तपशील). m. some सूक्ष्म कण प्राकलातील अत्यंत सूक्ष्म कण m. species सूक्ष्मजाती जातीचा एक लहान प्रकार m. spermous लघुबीजी लहान बीजे असलेली m. sporangium लघुबीजुककोश दोन प्रकारच्या बीजुकांपैकी लहान बीजुके असलेला पिशवीसारखा अवयव, उदा. सिलाजिनेला m. sporangiate लघुबीजुककोशिक लहान बीजुके असणाऱ्या बीजुककोशांची (किंवा परागकोशांची) निर्मिती करणारी नर पुष्पे (केसर पुष्पे) यांची निर्मिती करणारी (वनस्पती अथवा लघुबीजुककोश निर्मिणारे फूल किंवा शंकू) m. spore लघुबीजुक, लघुबीजाणु दोन प्रकारच्या बीजुकापैकी लहान, परागकण m. sporophyll लघुबीजुककोश धारण करणारे पान अगर तत्सम उपांग, छद, शल्क इ. m. sporocarp लघुबीजुकफल लघुबीजुककोश असलेला बंद बोंडासारखा अवयव उदा. ऍझोला (जलनेचापैकी) m. sporocyte लघुबीजुकजनककोशिका, लघुबीजाणुजनकपेशी लघुबीजुके निर्माण करणारी मातृकोशिका m. sporogenesis लघुबीजुकनिर्मिती लघुबीजुकांचे उत्पादन व विकास m. sporous लघुबीजुकी लहान बीजुके असणारी (वनस्पती) m. stome लघुतुण्ड लहान छिद्रस्वरुप द्वार m. stomous flower लघुतुण्डी पुष्प लहान तोंडाचे (पुष्पमुकुटाच्या द्वाराचे) फूल उदा. सदाफुली, जाई, जुई इत्यादी m. stylous लघुकिंजली आखुड व लांब किंजलाच्या (द्विरुप) फुलांपैकी आखुड किंजलाचे m. symbiont लघुसहजीवी दोन सहजीवीपैकी (एकत्र राहणारी) लहान, उदा. ऍझोला वनस्पतीच्या पानातील नीलहरित शैवल, ऍनाबीना, सायकसातील नॉस्टॉक, पहा symbiosis m. tome सूक्ष्मछेदक वनस्पती अथवा प्राणी यांच्या लहान शरीराचे किंवा अवयवांचे अतिसूक्ष्म काप (छेद) काढण्याचे यांत्रिक साधन m. tubule सूक्ष्मनलिका अतिलहान वेजाची नळी m. zooid सूक्ष्मचरगंतुक अत्यंत लहान व चलनशील प्रजोत्पादक कोशिका, उदा व्हॉलव्हॉक्स, स्फेरेला, युलोथिक्स इ. शैवले. m. zoospore सूक्ष्मचरबीजुक अत्यंत लहान व अस्थिर बीजुके, उदा. काही शैवले (युलोथिक्स) कवक इ.
|