-
स्त्री. १ ( हिं .) मिळकत , प्राप्ति ; नफा ; फायदा . कमाईस मोल येथे नका रीस मानूं । - तुगा ३३५ . जो दुवा देशील पांथा तेवढी माझी कमाई । यशोधनि - पाणपोइ . २ ( ल .) पुण्यायी ; भाग्य ; पुर्वसंचित . ' घटकेंच बुडाला सरली ज्याची कमाई । ' - ऐपो ४०५ . ' धन्य कमाई तयाची । ' - दावि २९० . ३ मशागत , मेहनत ( शेताची - नांगरून , खत घालून , पाणी देऊन , वगैरे ) ४ पीठ मळणें ( भाकरी करितां ); तिंबणें ( कणीकवगैरे ); चेंचणें . ५ तुडवणें ; मळणें ( चुना वगैरे ). एखादी वस्तु तयार करण्यासाठी मळणें , मिसळणें वगैरे करावी लागणारी खटपट . ६ वठणीस आणणें , शिकवून तयार करणें , ( घोडा वगैरे ). ७ कातडें कमाविण्याची क्रिया व त्याबद्दलची मजुरी . ( सं . कम् = इच्छा करणें , किंवा कृकर्म ; हिं . कमाई गो . कमाय )
-
०पूत वि. ( ना .) कर्ता मिळविता , कमाई करणारा ( पुरुष ). ( कमाई + पूत )
-
०चा - दैवहीन ; अभागी . ' मी तरी कमाईचाहीन । ह्यास्तव जीवीं वाटतो शीण । तूं अनाथ बंधु करूणाधन । तें साच वचन करि आतां ॥ '
-
हीन - दैवहीन ; अभागी . ' मी तरी कमाईचाहीन । ह्यास्तव जीवीं वाटतो शीण । तूं अनाथ बंधु करूणाधन । तें साच वचन करि आतां ॥ '
Site Search
Input language: