|
कर्दळ कुल, कॅनेसी केवळ कर्दळीच्या वंशाचा (कॅना) अंतर्भाव करणारे एकदलिकित फुलझाडांचे लहान कुल, याचा समावेश बदली गणात (सिटॅमिनी) केला जातो परंतु हचिन्सन यांनी झिंजिबरेलीझ अथवा शुण्ठी गणात घातले आहे. प्रमुख लक्षणे- मूलक्षोडयुक्त औषधी, पाने साधी, मोठी, सच्छद फुलोरा, द्विलिंगी मोठी आकर्षक फुले, परिदले सहा, पाकळ्या तळाशी केसरदलाशी जुळलेल्या, केसरदले सहा, त्यापैकी पाच वंध्य व पाकळ्यासारखी, एकावर अर्धा कार्यक्षम परागकोश, किंजदले तीन, अधःस्थ व त्रिपुटक किंजपुटात अनेक अधोमुख बीजके, बोंडात सपुष्क बिया Scitaminae
|