-
न. समुद्रांत
शिंपीच्या पोटीं जें रत्न उत्पन्न होतें तें ; मौक्तिक
मुक्ताफळ ;
मुक्ता ; मुक्तिका . मोतीं वजन करण्यासाठीं पुढील वजनांचा उपयोग करतात . -
- १३॥॥ टक्के किंवा १६ तंडुल = १ रति .
- २४ रति = १ टांक .
- १६ बदाम = १
दोकडा .
- ६। दोकडे = १ टक्का ;
- १ टाक = ६२ ट्रायग्रेन . - छअं . ७१ .
- १६
बदाम = १ दोकडा .
- १०० दोकडे = १ टक्का , चव .
- १३॥॥ टक्के = १ रती ;
- २४
रती = १ टांक ;
- २६ आणे = १ रती .
- २४ रती = १ टाक . - मुंव्या १२० .
-
- वरील पदार्थासारखा कृत्रिम पदार्थ करतात तो ; नकली मोतीं .
- सोन्याच्या तारेंत मोतीं ओंवून त्याचा नाकांत घालण्यासाठीं जो दागिना करतात तो ; नथ .
-
डोळ्यांतील
एक विकार , विकृति . मोतीबिंदु ; मोतिबिंब ; पटल . ( क्रि० उतरणें ;
पडणें ). [ सं . मौक्तिक ; का . मुत्तु ; प्रा० मोत्ता ] ( वाप्र . )
नाकापेक्षां मोती जड - मोतीं हें नाकाला
शोभा आणण्यासाठीं असतें . मोती जड झालें तर नाक तुटण्याचा संभव असतो
यावरुन एखाद्या गौण वस्तूला मुख्य वस्तूपेक्षां अधिक महत्व प्राप्त होणें
याअर्थी योजतात .
-
मोतीदाणा वि . मोत्याच्या दाण्यासारखा सुंदर ( मनुष्य , अक्षर ) धन्य भगवाना नेलास मोतीदाणा - ऐपो १३८ .
-
मोत्यांचा भांग पु . केसांच्या भांगांत घालावयाचा
मोत्यांचा दागिना . एक तर्हेचा मोत्यांनीं गुंफिलेला दागिना . -
तुळसीदास शाहीर यांचे पोवाडे .
Site Search
Input language: