|
पु. अव . साडा ( अर्धा ) याचें अनेकवचन . १ आणखी अर्धा याअर्थी तीनच्या वरच्या संख्यांना लावितात . उदा० साडेतीन - चार . २ शिवी , अपशब्द यापुढें आणखी , भरीस अर्धा या अर्थी वापरतात . उदा० साडेशिनळीचा - मात्रगमनी - हरामी . [ स + अर्ध - प्रा . अड्ढ ] ०तीन वि. ३॥ संख्या . काहीं प्रख्यात व्यक्ति व वस्तू यांचें प्रमाण - मापन दाखविणारी संख्या . उदा० साडेतीन तलवार ( करी )- भालेकरी - लिहणार , शहाणे , इ ००तीनपीठें नअव . ( देवीची ) १ तुळजापूरची भवानी . २ कोल्हापूरची अंबाबाई . ३ माहूरची देवी व ३॥ सप्तशृंगाची देवी . ०तीन , तीन पोशाख , तीन वस्त्रें - पु . नअव . पूर्वी दरबारांत अधिकार्यांना ३॥ वस्त्रें देत असत ती . १ पागोटें . २ शालजोडी किंवा शेला . ३ पायजामा किंवा झगा करण्यासाठी महामुदी या उंची वस्त्राचा तुकडा , व पटक्यासाठी किनखापीचा अर्धा तुकडा ( अर्धें ठाण ). पोशाक , तीन पोशाख , तीन वस्त्रें - पु . नअव . पूर्वी दरबारांत अधिकार्यांना ३॥ वस्त्रें देत असत ती . १ पागोटें . २ शालजोडी किंवा शेला . ३ पायजामा किंवा झगा करण्यासाठी महामुदी या उंची वस्त्राचा तुकडा , व पटक्यासाठी किनखापीचा अर्धा तुकडा ( अर्धें ठाण ). ०तीन पुअव . कोणतेहि काम करावयास दसरा , बलिप्रतिपदा व वर्षप्रतिपदा . ( पाडवा ). हे तीन अत्यंत उत्कृष्ट मुहूर्त असून अक्षय्यतृतीया किंवा नागपंचमी हे साधारणपणें अर्धवट उत्कृष्ट मुहूर्त समजले जातात . १ चैत्र शु॥ १ , २ आश्विन शु॥ १० , कार्तिक शु॥ १ व ३॥ अक्षय्यतृतीया किंवा नागपंचमी . मुहुर्त पुअव . कोणतेहि काम करावयास दसरा , बलिप्रतिपदा व वर्षप्रतिपदा . ( पाडवा ). हे तीन अत्यंत उत्कृष्ट मुहूर्त असून अक्षय्यतृतीया किंवा नागपंचमी हे साधारणपणें अर्धवट उत्कृष्ट मुहूर्त समजले जातात . १ चैत्र शु॥ १ , २ आश्विन शु॥ १० , कार्तिक शु॥ १ व ३॥ अक्षय्यतृतीया किंवा नागपंचमी . ०तीनराव पुअव . ( पेशवाईतील ) १ मुरारराव घोरपडे , २ भवानराव प्रतिनिधि , ३ गोपाळराव पटवर्धन व ३॥ थोरले माधवराव पेशवे . ०तीन १ ( पेशवाईतील ) १ सखारामबापु बोकील , २ विठठलसुंदर , ३ देवाजीपंत चोरघोडे व ३॥ नाना फडणीस . २ ( ल . ) दीडशाहाणा ; मूर्ख व बढाईखोर . पंधरेंपन्हरें - न . ( १५॥ ) सोनें अस्सल , उत्कृष्ट . १५॥ रु भावावरून नांव पडलेसें दिसतें . कां साडेपंधरया रजतवणी । तैशी स्तुतीची बोलणी । - ज्ञा १० . १५ . साडे पन्हरेयाची सरळें देवो लेइले हाती । - धवळे उ १९ . शहाणे १ ( पेशवाईतील ) १ सखारामबापु बोकील , २ विठठलसुंदर , ३ देवाजीपंत चोरघोडे व ३॥ नाना फडणीस . २ ( ल . ) दीडशाहाणा ; मूर्ख व बढाईखोर . पंधरेंपन्हरें - न . ( १५॥ ) सोनें अस्सल , उत्कृष्ट . १५॥ रु भावावरून नांव पडलेसें दिसतें . कां साडेपंधरया रजतवणी । तैशी स्तुतीची बोलणी । - ज्ञा १० . १५ . साडे पन्हरेयाची सरळें देवो लेइले हाती । - धवळे उ १९ . ०भावार्थी वि. ( उप . निंदाव्यंजक ) वरून भोळा पण आंतून पक्का लबाड ; बकवृत्ति माणूस . ०शंभर वि. ( अशुद्ध , अशिष्ट प्रयोग ) १००॥ . ०सातकी स्त्री. साडेसात बिघे जमीन . सातीफेरा , सातीचा फेरा - स्त्रीपु . १ एखाद्याची जन्मराशी व तिची मागची आणि पुढची राशी या तीन राशी क्रमण्याला शनिग्रहाला लागणारा साडेसात वर्षाचा काळ . २ ( हा काळ कष्टाचा जातो यावरून ल . ) आपत्काल ; दुर्दैवाचा फेरा . ( क्रि० येणें ; लागणें )
|