Dictionaries | References

वोज

   
Script: Devanagari

वोज

  स्त्री. रीत ; मार्ग . तेजाची वोज दावित । इंद्रुनीला । - ज्ञा ११ . ६०० . २ चांगली रीत ; व्यवस्था . जेणें मभ्दक्त पूजिले वोजा। ३ चांगुलपणा . [ सं . ओजस ; ऊर्जा उज्जा - वोजा . - भाअ १८३३ ; तुल० का . ओजे = व्यवस्था ] वोजा - वि . चांगला . सूर्यअस्तु हा समज वोजा । - क्रिवि . १ व्यवस्थितपणें ; चांगल्या रीतीने . तया बैसवी आसनी राम वोजा । - माधवरामायण अयोध्या ४६ . अमर करिती कृष्णपूजा । तैसीया वोजा पूजी व्दिजा । - एरुस्व ३ . २४ . २ सहज ; सोप्या रीतीनें . कैसे बंधन तोडिजेल वोजां । - विपू १ . ९५ . ३ संवयीनें . प्रवतें वोजा श्वान जैसा । - रंयोवा १ . ६९७ . वोजावणी - स्त्री . रीत ; वोज . वोजावणें - क्रि . १ रीत , मार्ग दाखविणें ; सुव्यवस्थित करणें . दाऊं वेल्हाळे देशी नवीजे साहित्यातें वोजावी । - ज्ञा १३ . ११५६ . २ नीट होणें ; सांवरणे . ऐसा अतिबळु संग्रामु झाला । न दिसे कोण्ही वोजावला । - कालिका २५ . १५ . वोजें - क्रिवि . वोजा पहा . नीटपणें . पांचहि प्रलय वोजें । तुज निरुपिलें । - दा १० . ५ . २८ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP