-
स.क्रि. १ चिंतन , विचार करणें ; मनांत धरणें , योजणें . तुम्ही अंक चिंता , मी प्रहरभर चिंतितों पण कांहीं सुचत नाहीं २ मनन करणें ; ( कांहीं एक गोष्ट कशी होईल , कशी करतां येईल इ० संबंधानें ) विचार करणें . लग्न कसें होईल हें मी चिंतीत होतों . ३ इच्छिणें ; देवाजवळ मागणें ( कल्याण , शुभ , अकल्याण इ० ). समस्तही चिंतू लागले । रघुपतीस कल्याण । ४ मनांत रचणें , कल्पिणें , धरणें , काढणें . चिंतिला मनोरथ पूर्ण होय । एक आवर्तन करितांचि । ५ ( शिकलेला , ऐकिलेला विषय ) मनांत घोळविणें ; मनन करणें . ६ बेत करणें ; योजणें . चिंतण घडेना पदरीं पडेना . [ सं . चिन्त = विचार , मनन करणें ]
-
चिंती परा, ते येई घरा
-
दुसर्याचे वाईट व्हावे अशी इच्छा केली तर अनेक वेळी आपणावरच आपत्ति येते. याकरितां कधीहि दुसर्याची हानि व्हावी असे मनांत आणूं नये.
-
To think, to exercise the mind in apprehension or excogitation. Ex. तुम्ही अंक चिंता मी प्रहरभर चिंततों पण कांहीं एक सुचत नाहीं. 2 To consider or ponder; to muse or meditate. Ex. लग्न कसें होईल मी चिंतीत होतों. 3 To wish, desire, intend. Ex. समस्तही चिंतूं लागले ॥ रघुपतीस कल्याण ॥. 4 To plan, scheme, contrive, invent; to conceive, imagine, think out. Ex. चिंतिला मनोरथ पूर्ण होय ॥ एक आवर्त्तन करितांचि ॥. 5 To reflect upon.
Site Search
Input language: