Dictionaries | References

विदारणें

   
Script: Devanagari

विदारणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. विदारून सांडणें To disperse, scatter, put to rout. Ex. किं जलदजाल प्रभंजन ॥ विदारून सांडी जैसें ॥.
vidāraṇēṃ v i unc To become wild, wanton, licentious; to run riot.

विदारणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   Tear; split. Slay.

विदारणें     

उ.क्रि.  १ फाडणें ; चिरणें . तें चौभेरी गिधीं विदारिजे । - ज्ञा २ . २०० . विदांरिन कुंभस्थळें । - एरुस्व १० . ५५ . २ फोडणें ; तोडणें ; तुकडे करणें . ३ ( काव्य . ) ठार मारणें ; वधणें ; कत्तल करणें . हिरण्यकश्यप विदारिला । भक्त प्रल्हाद रक्षिला । - तुगा २५२७ . ४ ( ल . ) विचिकित्सा करण ; उघडणें ; उकलणें ; फोड करून सांगण ( विषयाची ). ५ ( ल . ) पांगापांग करणें ; फाटाफूट करणें ; फांकाफांक करणे ; पळवून , हुसकून लावणें . जैसा गज घटा आंतु । सिंह लीला विदारितु । - ज्ञा १ . १६२ . [ सं . वि + दृ = फोडणें , चिरणें ] विदारक - वि . फाडणारा ; चिरणारा . विदारण , विदारणा , विदारणी - नस्त्री . विदारण्याची क्रिया ( सर्व अर्थी ). विदीर्ण - वि . फाडलेलें ; भग्न . विदारणीय , विदार्य - वि . फाडण्यासारखें . विदारित - धावि . फाडलेलें . विदारुंक - धाअ . ( गो . ) फाडावयास . विदारून सांडणें , विदारून सोडणें - पांगापांग करणें ; उधळून लावणें ; पळवून लावणें . कीं जलदजाल प्रभंजन । विदारून सांडी जैसा । विदारण्या - वि . भांडाभांडी लावणारा ; भेद करणारा ; चहाड ; चुगलखोर ; आगलाव्या .
अ.क्रि.  ( कु . ) स्वैर , स्वच्छंदी होणें ; उधळणें ; व्यसनी होणें ; अनिर्बंध वर्तन करणें . [ सं . वि + दृ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP