Dictionaries | References

वानर तेल

   
Script: Devanagari

वानर तेल

   [ एका नगरांतील राजा आपल्या लाडक्या मुलासाठीं बागेंतील वानरांना पुष्कळ व चांगलें खाऊं घालीत असे. त्या वानरांचा जो पुढारी होता त्यानें त्यांना बजावलें कीं, आज आपण चैनीत आहों पण लवकरच आपला सर्वोचा नाश होईल. कारण राजपुत्राची गाडी ओढणारा मेंढा हा फार अचपळ आहेतो पुष्कळदां स्वयंपाकघरांत घुसून अन्नाला तोंड लावतो तेव्हां आचारी हातीं लागेल तें घेऊन त्याला मारुन बाहेर घालवितात. एखादे वेळीं जळत्या लाकडानें त्यांनीं त्याला मारलें तर या मेंढयाच्या अंगावरची लोंकर पेटेल व तो पळत सुटेल. जवळच घोडशाळा आहे
   तेथें गवत असल्यानें तीहि पेटेल व आंतील घोडे भाजतील. राजा नंतर शालिहोत्र वैद्यांना यावर औषध विचारील व ते सांगतील कीं, वानरांची चर्बी लावल्यावर घोडे बरे होतींल. हा उपाय करण्यासाठीं राजा तुम्हांला येथें आयते धरुन सरसकट मारील. तेव्हां येथून चला कसे ! पण हा सल्ला दुसर्‍या वानरांनीं ऐकला नाहीं व ते वरील भविष्याप्रमाणें नाश पावले-अशी पंचतंत्रांत कथा ( ५.१० ) आहे.] अविचारी वागणुकीमुळें ओढवणारी आपत्ति, नाश. ‘ पुढें विनाशकाळें येणार भविष्य आलें तेव्हां वानरी तेलाचा जैसा प्रकार तैसा प्रकार घडला.’ -भाब २.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP