|
न. १ पात्रांवर अन्नादिक ठेवणें ; जेवणार्या मंडळीस अन्नादि पदार्थ पुरविणें देणें ; पानावर घालणें ; असें वाढलेले अन्न . २ न्हाणवलीसाठीं जें पान वाढून आप्तादिक आणतात तें ; जेवावयास न आलेल्या व्यक्तीस अन्न वाढलेलें पात्र पोंचविता तें ३ नोकरचाकर वगैरे लोकांस जें अन्न वाढून देतात तें . [ का . बडिसु ] वाढणी --- स्त्री . १ अन्नादि वाढावयाचें भांडें ; पात्र ; वेळणी . २ वाढण्याची क्रिया ; वाढप . सर्वाचा समाचार घेतात व वाढणीवर लक्ष ठेवून ... - पुरवणी ऐरापुप्र २ . १७ . वाढणें --- उर्कि . १ ( जेवणारास अन्न ) वाटणें ; देणें घालणें . २ ( दिव्यांत तेल , झाडास पाणी वगैरे ) घालणें ; पुरविणें . ३ ( भिक्षेकर्यस भिक्षा ) टाकणें ; घालणें ; ४ . सोडणें ; टाकणें ; लोटणें . समय हा मज काळाच्या मुखांत वाढील। - मोकर्ण २८ . ४८ वाढून ठेवणें , वाढून ठेवलेला असणें होणें --- तयार असणें ; वाट पहात असणें ( दुःख , संकट , त्रास इ .); दत्त म्हणून उभें असणें वाढूनं येणें --- एकामागोमाग येणें ; एकपाठीमागून एक येणें ( आजार , क्लेश , दुर्दैव वगैरे ). वाढता --- वि . वाढपी . म्ह० वाढत्यापेक्षा चहाडता गोड . वाढप --- न . १ वाढण्यासाठी घ्यावयाचे पदार्थ ; जेवण्याचे पदार्थ . २ वाढण्याची क्रिया ; वाढण . वाढपी , वाढप्या --- पु . वाढणारा ; जेवतांना खाद्यपदार्थ पानावर घालणारा . वाढलें --- न . वाढण अर्थ २ , ३ पहा .
|