Dictionaries | References

वर्तुळ

   
Script: Devanagari
See also:  वर्तुल , वर्तूळ

वर्तुळ

 ना.  गोल , चक्र , मंडल , वाटोळे .

वर्तुळ

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  एका स्थिर बिंदूपासून ठरावीक अंतरावर फिरणार्‍या रेषेमुळे बनणारी आकृती   Ex. वर्तुळाच्या मध्यबिंदूपासून वक्ररेषेपर्यंत काढलेल्या प्रत्येक रेषेची लांबी एकसारखी असते
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  लोकांची किंवा गटांची एक अनौपचारिक संघटना   Ex. शिकारीचे प्रमाण वाढतच जाईल का अशी भीती वनाधिकार्‍यांच्या वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
SYNONYM:
Wordnet:
kokदळ
urdٹولی , جماعت , دل , منڈلی
   see : गोल

वर्तुळ

  न. ( भूमिती ) ज्या आकृतीची मर्यादा एकाच वक्ररेषेने दाखविली जाते , व जीमध्ये असा एक बिंदु असतो की , त्यापासून त्या वक्ररेषेपर्यंत कितीहि सरळ रेषा काढिल्या तरी त्या समान असाव्यात अशी आकृति . - महमा ५ . - वि . वाटोळे ; गोल . [ सं . वर्तुल ] गति - स्त्री . वक्ररेषागति ; वक्रगति . वर्तुलाकार गती . ( इं . ) कर्व्हिलिनिअर मोशन .
०पाद  पु. व्यासावर लंब असणार्‍या त्रिज्येने अर्धवर्तुलाचे जे दोन समान भाग होतात त्यापैकी प्रत्येक ; पाववर्तुळ . क्षितिज आणि खस्वस्तिक यांच्या मधचे अंतर वर्तुलपादाइतके असते . - मराठीपु . पृ . ३१४ .
०मध्य  पु. मध्यबिंदु पहा .
०मय वि.  गोलाकृति ; गोलीय . ( इं . ) स्फेरिकल . वर्तुलाकार , वर्तुळाकार पु .
   पूर्णनाश ; फन्ना ; उध्वस्तता . परचक्राने गांवचा आणि शेतमळे ह्यांचा अगदी वर्तुळाकार केला .
   पूर्णपणे खलास , खर्च , क्षय ; अगदी अकिंचनता . - वि . वाटोळे ; गोल .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP