|
पु. पु. धुण्याच्या कपड्यांचा बोजा , ढीग . ( कालवलेले पीठ , मळलेला चिखल , चुना इ० कांचा भिंत इ० कांवर मारण्याजोगा ) गोळा ; ( सामा . ) चांगला भिजवून मळलेला गोळा . बोजा ; ओझे ; भारा ; लागेल त्यापेक्षां अतिशय जास्त प्रमाणांत असणारा कोणताहि पदार्थ ( भात , गूळ इ० ). पाण्याचे बांध तयार करण्यासाठी पळीवाने खणून काढलेल्या मातीचे चौरस गोळे . ( पीठ , भात , गूळ इ० कांचे ) पातळ स्वरुप ; लिबलिबीत अवस्था . ( क्व . ) गुंता ; लगदा ; एकमेकांत मिसळलेला जुडगा ( केंस , कपडा , कागद इ० चा ). पाणवट चिखल . लादा लाटा कातरे । ठाईं ठाईं - दा ११ . ६ . ३ . अशी गुंतागुंत , एकत्रित झालेली स्थिति . लादावर्दीचे काम - न . ( लादलेले असल्यामुळे ) अव्यवस्थित , कसे तरी केलेले काम .
|