Dictionaries | References

रोज

   
Script: Devanagari
See also:  रोंज

रोज

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

रोज

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  हळडुव्या रंगाचें एक गोल परमळीत फूल   Ex. फुलकान्न रोजांची माळ करता
ATTRIBUTES:
HOLO COMPONENT OBJECT:
रोज
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
 noun  जाचीं परमळीत फुलां चड करून हळडुव्या रंगाचीं आनी वाटकुळीं आसतात असो एक रोंपो   Ex. ताणें आपल्या मुखार रोजांचीं झाडां लायल्यांत
MERO COMPONENT OBJECT:
रोज
ONTOLOGY:
झाड़ी (Shrub)वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)

रोज

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . 2 hire or wages for a day. 3 The sum paid daily to the messenger of government or of a creditor sent to dun. 4 used as ad daily. रोजचा daily, quotidian.

रोज

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A day. wages for a day.
 ad   daily.

रोज

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adverb  प्रत्येक दिवशी   Ex. तो रोज सकाळी उठून पूजा करतो
ONTOLOGY:
समयसूचक (Time)क्रिया विशेषण (Adverb)
 noun  एका दिवसाची मजुरी, पगार   Ex. सदूला ऐंशी रुपये रोज मिळतो
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

रोज

  पु. 
  न. ( गो . ) झेंडूचे फूल .
  न. ( नाविक ) गलबताच्या बांधकामास लागणारे प्रारंभीचे मुख्य लांकूड . ही रोजे दरेक गलबतास दोन असतात , एक मागेदुसरे पुढे . पुढील रोज हे मुख्य होय .
   दिवस ( २४ तास ); अहोरात्र . तीन रोज मुर्दा राहिला अझुनि कांही हेतू नाही पुरला । ०ऐपो १६४ .
   दिवसाची मजुरी ; एका दिवसाचा पगार . सदूला बारा आणे रोज मिळतो .
   सरकार किंवा सावकार इ० कांकडील तगाददार आला असता त्याचा आपल्याकडून खोळंबा होऊन दिवस मोडल्यामुळे त्याला द्यावे लागणारे द्रव्य . - क्रिवि . प्रत्यही ; प्रतिदिवशी ; दररोज ; प्रत्येक दिवसाला . बकासूर रोज गांवकर्‍यांकडून गाडाभर अन्न घेत असे . [ फा . रोझ ] म्ह० रोज मरे त्याला कोण रडे .= तीच तीच गोष्ट वारंवार होऊ लागली म्हणजे तिच्यांतले स्वारस्य जाऊन तिजकडे दुर्लक्ष्य होते . सामाशब्द -
०करी  पु. रोजच्या बोलीने कामावर ठेवलेला गडी .
०काम  न. 
   दररोजचे काम .
   प्रत्येक दिवसाचे कांम ज्यांत टिपून ठेवलेले असते ती वही ; डायरी . त्या दिवशीच्या रोजकामांत उल्लेख ... - ऐरापुप्र २ . ११६ .
०कीर्द  स्त्री. 
   दीनचर्या ; डायरी .
   रोजचा जमाखर्च ; रोजच्या रोज जमाखर्च ठेवण्याची वही ; रोजखर्डा .
   रोजच्या गरजा ; कुटुंबपोषणादि कामांस नित्य लागणारा खर्च ; कुटुंबाच्या नित्य गरजा पुरविणे . ( क्रि० चालणे ) रोजकिर्दी जमा धरुनी सकळ । खताविला काळ वरावरी । - तुगा १८९४ . [ फा . ]
०कीर्दवही  स्त्री. रोजच्या हिशोबाची वही .
०खरडा   खर्डा पु . व्यापार्‍यांचे रोजच्या व्यवहाराचे टांचण ; रोजचे कच्चे टांचण ; रोख विक्रीचे कच्चे टांचण . [ रोज + खर्डा , सिं . खरिडो ]
०गार  पु. 
   धंदा ; चाकरी ; नोकरी ; उद्योग ; पोट भरण्याचे किंवा निर्वाहाचे साधन ; पैसा मिळविण्याचा उद्योग . आतां शेतकीच्या रोजगारांत जीव राहिला नाही .
   कोणताही उद्योग ; काम . त्याची गोष्ट यापाशी सांगणेयाची त्यापाशी सांगणे असला रोजगार आम्हाला होत नाही . [ फा . ]
०गारशीर वि.  धंद्या - उद्योगांत पडलेला ; नोकरी असलेला ; चाकरमान्या .
०गारी वि.  
   नोकरी असलेला ; उद्योग असलेला ; नोकर .
   व्यापारधंदा किंवा अन्य व्यवसाय करुन पोट भरणारा .
०गुजारा  पु. रोजच्या गरजा भागवून दिवस ढकलण . ( क्रि० करणे ; होणे ; चालणे ). [ फा . ]
०गुदस्त   स्तां क्रिवि . काल ; आदल्यादिवशी ( जमाखर्चातील शब्द ) [ फा . ]
०दार   रोजनदार रोजंदार रोजिनदार - पु . रोजमुर्‍याचे काम करणारा ; मजूर . रोजंदारी रोजनदारी रोजिनदारी - स्त्री . रोजची मजूरी ; रोजच्यारोज केलेल्या कामाबद्दल दिले जाणारे वेतन . रोजदुकू - पु . ( राजा . कुण . ) रोजमुरा .
०नामा  पु. ( कायदा ) एखाद्या फिर्यादीचे किंवा कोर्टाचे रोजच्या कामाचे टांचण , टिपण .
०नामा   निशी नामचा पुस्त्री .
   रोजकीर्द ; रोजच्या जमाखर्चाचे टिपण ; दिनचर्या ; दैनंदिनी . [ फा . ]
०मजुरी  स्त्री. दिवसाचा पगार ; दिवसाचे वेतन .
०मजुर्‍या वि.  रोजाने काम करणारा ; दिवसाच्या कामाची त्याच दिवशी मजुरी घेणारा ; दिवसाच्या कामाची मजुरी ठरवून काम करणारा .
०मरा   मारा मुरा मुर्‍हा , रोजमरह पु . मजुरी ; मुशाहिरा ; दिवसाचे वेतन ; पगार . तमाम फौजामिळोनि दिले रोजमुरे त्यांशी । - ऐपो २७५ .
०मेळ  पु. 
   रोजच्या जमेचा व खर्चाचा मेळ .
   रोजकीर्द ; रोजचा रोखीचा व्यवहार नोंदण्याची वही ; रोजखर्डा .
०रोज   क्रिवि . प्रत्यही ; दररोज .
०वडा  पु. ( कारकून लोकांत रुढ ) दिवसाचा हिशेब ; एका दिवसाचा जमाखर्च .
०वारी  स्त्री. रोजच्या कामाच्या हिशेबाचे पुस्तक ( माहेवारी , सालवारी इ० प्रमाणे हा शब्द सारावसुली खात्यांत रुढ आहे ). रोजारोजी स्त्री .
   रोजमजुरी ; प्रत्येक दिवशी मिळणारा दिवसाचा पगार ; मजुरी . रोजारोजी करुन पोट भरतो .
   हातावरचे पोट ; रोज मिळवून रोज खर्च करणे . मी रोजारोजीत आहे . - क्रिवि . मिळवावे आणि खावे अशा रीतीने . मी काय उत्पन्नभक्षी नाही , माझा निर्वाह रोजारोजी आहे . [ रोज द्वि . ] रोजिदार , रोजिनदार , रोजिनदारी - रोजनदार , रोजनदारी इ० पहा .
०उठून   क्रिवि . प्रत्यही ; रोजच्या रोज ; दररोज . आम्ही रोज उठून तुम्हांला ताक कोठून पुरवावे ? रोजचा वि . नित्याचा ; नेहमीचा . रोजचे रोज क्रिवि . दररोज ; प्रत्येक दिवशी ; नित्य . रोजिना , रोजीना पु . रोजची मजुरी ; मुशारा . - वि . क्रिवि . दररोज ; प्रत्येक दिवशी . रोजीना चार हत्तीस पंचवीस रुपये खर्च . - ख २ . ५४० . [ फा . रोझीना ] रोजी स्त्री .
   कुटुंबाचा एक दिवसाचा खर्च ; रोजचा खर्च .
   दिवसाचे वेतन ; पगार ; मजुरी .
   ( ल . ) दुसर्‍यापासून रोजच्या रोज मिळणारी वस्तु ; रोजचा भत्ता ; रोज मिळणारे अन्न .
   मोहरमांत फकिरास केलेला धर्म ; भिकार्‍यास दिलेला पैसा . [ फा . ] रोजीवाला - वि . रोजची नेमणूक , मजुरी , भिक्षा मिळविणारा ; रोजगारी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP