Dictionaries | References र रुपणे Script: Devanagari Meaning Related Words रुपणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. रुतणे ; दलदलीत किंवा भसभुशीत जागेत खचणे ; खोल जाणे ; शिरणे ; अडकणे .बोचणे ; खुपणे ; रुतणे . जैशी केशनखे आंगे वाढती । आपुली आपणाते रुपती । - रावि ६ . २१८ .खोंचणे ; रोवणे ; पुरणे . आचारभंगाची हाडे । रुपती इंद्रियापुढे । मरे जरी तेणेकडे । क्रिया जाय । - ज्ञा १४ . २४९ . रुपण - स्त्रीन . रुतण ; मऊ जमीन ; भुसभुशीत जागा ; ( जमीन , मांसल भाग , किंवा सामान्य पदार्था यांचा ) रुपले जाण्यासारखा भाग . रुपणी - स्त्री . ( कों . ) रुपण्याची , पुरण्याची काठी ; पुरुष दीड पुरुष उंचीची काठी . बिबळ्या मांडवास खाजणी रुपण्या चांगल्या परवडतात . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP