|
स्त्री. दमून जाणें ; थकवा ; दमणूक ; ग्लानि . ( म्हातारपणामुळें किंवा जास्त परिश्रम केल्यामुळें आलेला )- वि . मोडलेला ; र्हास पावलेला ; नाश पावलेला ; नादुरुस्त झालेला ( उद्योग , इमारत , व्यापार इ० ); नाश झालेली ( स्थिति ). ( क्रि० येणें ; होणें ; घालणें ; आणणें ) अव्यवस्थित ; अस्ताव्यस्त ; नादुरुस्त ( सरंजाम , सैन्य इ० ) तुकडे पडणारा , ढिसूळ , मोडणारा , पिठूळ , फुसका ; चुरा होणारा ( तांदूळ इ० . ) मोडकळणें , मोडकळीस येणें - क्रि थकणें ; दमणें . ( म्हातारपणामुळें इ० ); नाश होणें ; र्हास पावणें ; नादुरुस्त होणें - असणें ; बिघडून जाणें . - मोवन १२ . १५९ . मोडका - वि . मोडलेला ; दुखविल्यानें अगर भंगल्यामुळें मोडल्यामुळें निरुपयोगी किंवा अधु झाला आहे असा ( पदार्थ ). [ मोडणें ] ०तोडका वि. मोडावयास झालेला ; मोडकळीस आलेला . ०वाणी पु. लहान प्रमाणांत व्यापार करणारा व्यापारी ; जुन्या पुराण्या मालाचा , तुटपुंज्या भांडवलावर धंदा करणारा वाणी , घेवारी ; डाळपिठ्या , हिंगमिर्या वाणी . मोडकी स्त्री . ( सामा . ) मोडलेली स्थिति ; मोड ; पराभव ; मोडल्या बद्दलचें अपयश . अडथळा ; प्रतिबंध ; हरकत ; अडचणीचें कारण . ( क्रि० आणणें ; ठेवणें ; घालणें ; येणें ). बिघाड ( कामाचा , उद्योगाचा , मताचा ). चार मनुष्यें काम चालविणारीं परंतु कामाची मोडकी मुख्याच्या डोकीवर येते . खंडन ; मोड ; वितंडा ; खोटें करुन दाखविणें ; निरुत्तर , कुंठित करणें . ( क्रि० येणें ; आणणें ). [ मोडणें ] ०कांटी काठी - स्त्री . मोडून पडलेलें कांटेरी झाड , काठी . ( ल . ) ज्या मनुष्याची सत्ता , अधिकार इ० नाहिशीं झाली आहे अशा मनुष्याबद्दल उपयोग . म्ह० मोडकी काठी भलताच लाटी .
|