Dictionaries | References म मेळवण Script: Devanagari See also: मेळवणी , मेळविणें Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मेळवण A dictionary, Marathi and English | Marathi English | | mēḷavaṇa, mēḷavaṇī, mēḷaviṇēṃ more commonly मिळवण &c. Rate this meaning Thank you! 👍 मेळवण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. समूह . जें महामोहाचें मेळवण । - एभा १४ . ३६७ . ( ना . ) जनावरांस खाऊं घालावयाचें मिश्रण . ( व . ) गाई - म्हशीस चारावयाचा दाणा ; आंबवण . मिळवण पहा . ( सामा . ) मिश्रण . [ सं . मीलन ] मेळवणी - स्त्री . मिश्रण ; मिळवणी . अतिशयोक्ति . [ गुज . ] मेळविणें - सक्रि . एकत्र जुळणी करणें . मेळविला भोयांनीं । पालखींत घालून चालविला । - ऐपो २० . मिळवणें ; मिसळणें . युक्ती मेळवितां द्रव्यांतर । - एभा २ . ५८० . मेळा - पु . मनुष्यांचा समुदाय ; जमाव ; जमात ( विशेषतः धार्मिक किंवा व्यापारी उद्देशानें विशिष्ट काळीं जमलेला ); जत्रा इ० . ( क्रि० भरणें ; जमणें ). संगम ( नदीचा ) पाहुं पंचगंगेचा मेळा । स्नान करुं गंगेचें । - गंगेची भूपाळी . गणपतीच्या उत्सवांत पदें म्हणणार्या , टिपर्या खेळणार्या मुला - मुलींचा संघ , समुदाय . पंच ; संघ . आमचा मेळा निवडा . [ सं . मिल = भेटणें ] मेळ्यास मिळणें - पैकीं एक म्हणून जाऊन मिळणें . मेळाप - पु . समुदाय . तैसा सज्जनांचा मेळापीं । - ज्ञा १८ . १५२१ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP