|
पु. मल पाहा . पु. घाण ; केरकचरा ; रेंदा . विष्ठा . मज उपजतांचि मळसा त्यजिलें याहून काय अत्याग । - मोभीष्म १२ . ५६ . पाप ; पापवासना . जाऊनिया मळ । वाळवंटीं नाचती । - तुगा ७६७ . कमीपणा . म्हणे कर्मनिष्ठां मळु । ठेविला देखों । - ज्ञा १८ . ६२ . दोष . म्हणे तुम्ही निष्पाप निर्मळ । तंव तुमचेनि दर्शनें तत्काळ । नासती सकळ कळिमळ । ऐसे निजनिर्मळ तुम्ही सर्व । - एभा २ . २४३ . - स्त्री . ( राजा . ) अंगावरच्या मळाची वळी ; मळी . [ सं . मल ] मळई - स्त्री . पावसानें किंवा नदीच्या प्रवाहानें वहात आलेली माती , पानें , कचरा इ० . अशा जागेवर केलेलें बागाईत . मासे धरण्याचें जाळें . - बदलापूर . साय . ( प्र . ) मलई पहा . मळकट - न . पाप . जें त्रिविधीं मळकटां । तूं सांडिलासि सुभटा । - माज्ञा १५ . ५८१ . मळाचें पुट ; थर तैं कळिमळांचीं मळकटें । नामोद्धाटें नासती । - एभा ४ . २५३ . - वि . मळलेला ; घाणेरडा ; मलिन . मळकटणें - अक्रि . मळणें ; घाणेरडें , मलिन होणें . मळकटा - पु . मळाचा थर , लेप . धुऊनिया मळकटा । बुद्धीचा तेणें । - ज्ञा १८ . १०११ . मळका - वि . घाणेरडा ; मळलेला ; मलिन . मळकी - स्त्री . नदीच्या प्रवाहाबरोबर आलेला गाळ . गाळ सांठून झालेली जमीन ; मळई . ( बे . ) अशा जमिनीवर केलेली लागवड . मळई पहा . मळकोरा , मळखोरा - वि . मळकट रंगाचें , नवीनपणांचा तजेला कमी झाला आहे असें ( नाणें ). मळघाऊ , मळखाऊ , घाव - वि . जो मळला असला तरी मळलेला दिसत नाहीं असा ( रंग ). कष्ट , आजार इ० न चरफडतां सोसणारा . बाहेरुन सुंदर पण आंतून घाणेरडा दिसणारा ( मनुष्य , पदार्थ ). मळगावणें , मळघावणें - सक्रि . खराब , घाण करणें ; मळविणें ; मलिन करणें . मळणें - अक्रि . मलिन , घाण होणें . मोहानें व्याप्त होणें . मळलें होतें मन , परि केलें त्वां शुद्ध , तुजकडे वळलें । - मोकर्ण ४३ . २३ . मळमास , मळयागर , मळशुध्दि - मलमास इ० पहा . मळविणें - सक्रि . मळानें युक्त करणें ; घाणेरडे करणें . ( पराभव , इ० नीं . तोंड ) उतरविणें . पळवी सुयोधनातें , त्यासकट तदाश्रिताननें मळवी । - मोविराट ६ . १४४ . मळाचा कोठा - मलाशय . मळी - स्त्री . अंगावरच्या मळाची वळी . पावसानें किंवा नदीच्या प्रवाहाबरोबर वाहून येतो तो गाळ ( सामा . ) चिखल आतां गंगेचें एक पाणी । परि नेलें आनानीं वाहणीं । एक मळी एक आणि । शुद्धत्व जैसें । - ज्ञा १७ . १९६ . नदीकांठची बागाइती जमीन ; मळई . काळी मळी पांडरा चोळ । परी ते केवळ वसुधाची । - एभा ४ . २६० . अशा जमिनीवर केलेली बागाइती शेती , लागवड . साखर , गूळ इ० शुद्ध करताना निघतो तो मळ . कोणत्याहि पदार्थांवर येते ती मळकट साय . ( राजा ) मोठ्या शेतात बांध घालून पाडतात तें लहान खोंचे . भाग प्रत्येकी ( व ) नदीकांठची पडीत जमीन ( न्हावी धंदा ) डोक्यातील मळ काढण्यासाठीं कोईचें केलेलें साधन - वि . ( जुन्नरी ) मळकट , धुरकट रंग असलेली ( मेंढी ). ही मेंढी मळी आहे मळीण , मळिण - वि . मळलेला घाणेरडा ; ओंगळ ; अस्वच्छ . ( ल . ) पापानें युक्त ; पापी ; दोषी तयार नसलेली ; विसरलेली ( विद्या , कला इ० ). म्लान ; मलूल . कुंथाच्या ढेंकरें न दवेल पुष्टी । रुप दावी कष्टी मळिण वरी । - तुगा २८७६ . [ सं . मलिन ]
|