Dictionaries | References

भाक

   
Script: Devanagari

भाक     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
until the fulfilment of a vow made. v ठेव, उतर. भाक उतरणें or भाकेस उतरणें To come to pass or be made good--a promise or pledge. भाक सत्य करणें To redeem, verify, or make good one's promise. भाकेस गुंतणें To be constrained or bound by one's word or pledge.

भाक     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A promise; an agreement.

भाक     

ना.  आणभाक , करार , ठराव , प्रतिज्ञा , शपथ ;
ना.  आश्वासन , खात्री , वचन .

भाक     

 स्त्री. 
वचन ; खात्री ; आश्वासन . ( क्रि० देणें ) नारायणा आम्हा नाहीं वेगळीक । पूर्वील हे भाक सांभाळिली । - तुगा ३११ .
परस्परांतील ठराव ; करार ; ( आण शब्दाला जोडून येतो ) कबुलायत . जैसी पूर्वजांची भाक । पाळिती सत्यवादी लोक । - एभा ७ . ५६८ .
केलेल्या नवसाची फेड होईपर्यंत देवापाशीं अनामत ठेविलेला पदार्थ .
भाषण ; उक्ति .
( व . ) विनवणी . [ सं . भाषा ]
०उतरणें   भाकेस उतरणें - वचनाप्रमाणें हातून कृति घडणें .
०देणें   वचन , कबूली देणें ; शपथ घेणें . न करी चिंता वेळोवेळीं । म्हणोन भाक देतसे । - गुच १२ . ५३ .
०सत्य   - दिलेला शब्द खरा करणें ; वचनाप्रमाणें कृति करणें . भाकेस गुंतणें - वचनांत , शब्दांत गुंतणें . यदुतिलक जिचे हा गुंतला पूर्ण भाके । - सारुह ४ . ४७ .
करणें   - दिलेला शब्द खरा करणें ; वचनाप्रमाणें कृति करणें . भाकेस गुंतणें - वचनांत , शब्दांत गुंतणें . यदुतिलक जिचे हा गुंतला पूर्ण भाके । - सारुह ४ . ४७ .
०पालक  पु. वचन पाळणारा . - ख्रिपु
०बाहण  स्त्री. 
प्रतिज्ञा ; वचन ; शपथ ( देवापाशीं घेतलेली ). देवाला भाकबाहणीवर गुंतविलें .
नवसाची फेड होईपर्यंत देवापाशी अनामत ठेविलेला पदार्थ . भाक पहा . देवाची भाकबाहण ठेवली . [ भाक + बाहण ( द्विरुक्ति शब्द ) ] भाकणें - उक्रि .
भविष्य सांगणें . दिवटा सरवदा भाकून गेला । अंतरीं धोका लागला । - दा ३ . ७ . ५९ .
अभिवचन , आश्वासन म्हणून देवाजवळ कांहीं वस्तु ठेवणें .
( काव्य . ) मागणें ; इच्छिणें ; दीनवाणीनें विनंति करणें ( करुणा , कीव , काकुळति इ० शब्दाबरोबर उपयोग ). भाकावी करुणा । विनवा वैकुंठीचा राणा । - तुगा ६७३ . [ सं . भाष ] भाकणूक - स्त्री .
देवाकडून मिळालेलें उत्तर .
( क . ) भविष्य कथन .
बोलणें ; सांगणें .
कौल ; शकुन .
विनवणी . [ भाकणें ] भाकीत - न . भविष्य . ( क्रि० करणें ; सांगणें ). [ सं . भाषित ; भाकणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP