|
स.क्रि. जाड दळणें . ( ल . ) सरासरी व ओबडधोबड रीतीनें करणें ; भरकटणें . भरडण - न . भरडण्यास घेतलेलें धान्य . जाड कणीदार दळण . दोन पायली भरडणाचें भरडण करावयाचें आहे . भरडणी - स्त्री . जाड दळण इ ०भरडा पु. कळणा ; भरडलेले तांदूळ व उडीद , इतर डाळी यांचें मिश्रण . भरडलेली डाळ , धान्य . भरडी - वि . भरडलेली ( डाळ , धान्य , औषधी मसाले , चुना ); भरड्याची केलेली ( थुली , भाकरी , पोळी , औषध ). भरडींव - वि . भरडलेलें ( धान्य , डाळ ).
|