-
स्त्री. १ गोष्ट ; रचलेली गोष्ट ; कल्पित गोष्ट ; कहाणी ' कथा बोलूं हे मधुर सुधाधारा । ' - र १ . २ हकीकत ; वर्णन . ' स्मरला स्मरहर भरला कंठ न वदवेचि ते कथा राहो । ' - मोसभा १ . ३३ . ३ टाळ , मृदंग , वीणा इ० साधनांनी हरिदास देवादिकांचें गुणवर्णन करतात ती ; कीर्तन देवादिकांच्या गोषटी सांगणें ; हा एक सार्वजनिकक करमणुकीचा , परमार्थ साधनाचा प्रकार आहे . ' चार्तुमासंत बहुतेक देवळांतून कथा चालतात .' ४ केलेलें कृत्य ; काम ; ( पराक्रमाचा ) प्रसंग ; पराक्रम . ' गेला माधव लोक सोडून किती गाऊं तयाच्या कथा । '; ' अशा त्याच्या कथा आहेत बाबा !' ५ ( ल .) महत्व ; वजन ; पर्वा ; मातब्बरी ( मनुष्य , वस्तु वगैरेंची ) किंमती पहा . ' तो दुसरा ब्रह्मा करील उप्तन्न । मग ऐसियाची कथा कोण । ' - नव १६ . ६८ . ' क्षुद्रा पशु पक्ष्यांची काय कथा पांचही महाभुतें । ' - विद्याप्रशंसा ( चिपळूणकर ) ७ . ६ भाषण ; म्हनणें ; सांगणें . ७ हकीकत ; ग्रंथार्थ ; विषय . ' तूं संतस्तवनीं रतसी । कथेची से न करिसी । ' - ज्ञा . ५ . १४१ . ( सं .)
-
०होणें क्रि . केवळ कथेंत राहणें ; नुसती कथा बनणें ( खरें अस्तित्व नसणें ); स्मृतिरूपानें अस्तित्व असणें . कथेची गति - स्त्री . कथा सुरु , चालू असणें ; कथेचा ओघ प्रवाह . ' जेव्हां कथेची गति हे वदावी । धनुष्यभंगी रस रौद्र दावी । ' - वामन - सीता - स्वयंवर ४९ . - नुसंधान - न . वृत्तवर्णनाचा संदर्भ , संबंध ; गोष्टीची , हकीकतची संगति .
-
०प्रसंग पु. १ गोष्टीचा , संभाषणाचा ओघ . २ गोष्टीतील , वर्णनांतील प्रसंग .
-
०बांधणें क्रि . कथा रचणें , लिहिणें ; पद्ममय रचनेंत चरित्र लिहिणें . ' तथापि बांधेन कथा विचित्रा । ' - सारुह १ . ३० .
Site Search
Input language: