Dictionaries | References

बुनाद

   
Script: Devanagari
See also:  बुनियाद , बुन्याद

बुनाद     

 स्त्री. 
जोर ; शक्ति ; जोम .
( ल . ) बिशाद ; मजाल . ह्याची काय - किती बुनियाद आहे कीं हा हजार रुपये खर्च करील ?
वजन ; किंमत ; प्रभाव ; महत्त्व .
भांडवल ; साधन ; कोणत्याहि कामास लागणारी सामुग्री .
पाया . कार्यभाग उरकावयाची बुनियाद घातली होती . - पेद २१ . १४९ .
आरंभ ; सुरवात . त्यास आपण बुनादीपासून आपले वतानचें वर्तमान व कागदपत्र तमाम दाखविले . - रा ८ . ४४ .
स्वभाव ; शील . हलक्या गोष्टी आम्हांकडील नवाब व रुक्नुद्दौला हैदरखांच्या वकिलाशीं बोलत असल्यास त्याचा प्रकार , बुनियाद कशी आहे तें कळतच आहे . - ख १०७४ .
( व . ) हद्द ; सीमा ; मर्यादा . ह्या गाडीची किंमत शंभर रुपये असेल , बुनियाद झाली . - वि . जुनाट ; फार प्राचीन काळापासून चालत आलेला ; जुना ( मनुष्य , हुद्दा , मालमत्ता इ० ). [ फा . बुन्याद ] बुन्याद होणें - ( व . ) अखेर होणें , बुनियादी , बुनादी , बुन्यादी - स्त्री . मूळापासूनची सर्व हकिकत . आपले वडिलांनींही कुल बुनादी सांगितली होती . - रा १५ . ७५ . - वि . जुना ; मूळापासून चालत आलेला . याची देशमुखी अव्लादी - बुनादी होती ऐसें आपणांस ठावकें आहे . - रा १५ . ७५ . बुनादीचें - वि . प्राचीन ; अनादि काळचें . तुका म्हणे बुनादीचें । झालें साचें उजवणें । - तुगा ४०४७ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP