Dictionaries | References

बापडीक

   
Script: Devanagari
See also:  बापडा , बापुडा , बापुडीक

बापडीक     

वि.  
गरीबबिचारा ; सौम्य ; निरुपद्रवी .
मूर्ख ; वेडगळ ; दुर्बल ; दीनवाणा ; अनाथ . जयास ब्रह्मादिक वंदिती । तेथें मानव बापुडें किती । - दा १ . २ . २७ .
बाप नसल्यानें पोरका . - उद्गा . औदासिन्य किंवा निष्काळजीपणा दाखवितांना योजितात . करणार तर कर बापडें , माझें काय गेलें . [ देप्रा . बप्पुड ; गु . बापडुं ] म्ह० आपलें तें बापडें आणि दुसर्‍याचें तें कातडें = आपलें मूल मात्र गरीब व कोंवळें आणि दुसर्‍याचें मार खाण्याला धडधाकड . बापुडवाणा , णी - वि .
गरीब ; निराधार ; निराश्रित . कशी टिकावी तेथें वाणी मग बापुडवाणी । - विक ३ .
केविलवाणा ; कींव येण्याजोगा ( आवाज , भाषण इ० ). बापुडा , बापुडीक - वि . बापडा पहा . [ बाप + उडॉ = टाकलेला ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP