Dictionaries | References

बद

   
Script: Devanagari
See also:  बदकन , बदकर , बददिनी , बददिनीं , बददिशी , बददिशीं

बद     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : बुरा, बाघी

बद     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A venereal bubo. 2 The hole or ring at marbles.
Fully, to the full &c.
Bad. Only in comp., but this abundantly, and whether with elegance or propriety or in gross violation of both. Examples follow.

बद     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A venereal bubo.
ad   Fully.
  Bad. Only in comp.

बद     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : घनवर

बद     

वि.  वाईट ; नीच ( विशेषत : समासांत उपयोग ). [ सं . वध ; फा . बद ; इं . बॅड ] सामाशब्द -
क्रि.वि.  पुरतेपणीं ; पुरा होईतों ; कांठोकांठ इ० [ बद्द ध्व . ]
क्रि.वि.  मृदु व थलथलीत पदार्थांचा कठिण पदार्थाशीं संबंध होतांना , लोणी , शेण इ० चा गोळा पडतांना , चिखलांत पाय घसरतांना होणार्‍या आवाजाप्रमाणें आवाज होऊन . [ ध्व . ]
 न. ( व . ) भुकटी ; पीठ . राळेचें बद विकत मिळतें .
 पु.न. गर्मीमुळें होणारें गळूं किंवा उठाणूं .
०मल, अम्मल अमल अमली  पु.स्त्री. दुष्कर्म ; व्यभिचार ; अविवाहित स्त्रीशीं गमन . सन्तु जाधवीण , तिनें बद - अमल केला . - ख ८ . ४२१३
( गोट्यांचा खेळ ) गोटी टाकण्यासाठीं केलेली लहानशी खाच ; गल .
  1. ( व . ) ठेंगणी , सखल जागा .
  2. हराम खोरी . बद - अमली करुन बसल्यास रुपये श्रीमन्तांचे सुटतात असें नाहीं . - ख ७ . ३७५५ .
  3. गैरवर्तणूक ; बेबंदशाही . मुलकांत बद - अमली जाली आहे . - दिमरा १ . २२४ . [ फा . ]
  4. (विटीदांडू ) पांचव्या दांडूचें अंतर किंवा टोला . ( क्रि० मारणें ). [ हिं . बद ]

हराम खोरी . बद - अमली करुन बसल्यास रुपये श्रीमन्तांचे सुटतात असें नाहीं . - ख ७ . ३७५५ .
 स्त्री. ( विटीदांडू ) पांचव्या दांडूचें अंतर किंवा टोला . ( क्रि० मारणें ). [ हिं . बद ]
गैरवर्तणूक ; बेबंदशाही . मुलकांत बद - अमली जाली आहे . - दिमरा १ . २२४ . [ फा . ]
०अहदी   कौली - स्त्री .
वचनभंग ; शब्दाप्रमाणें वर्तन न करणें . टिपू बहादूर यांनीं बद - अहदी केल्यास तिहीं सर्कारांनीं येक होऊन त्याची तम्बी करावी . - रा ७ . २ .
गैर - सलूक ; अमैत्री . [ फा . ]
०कर्म   ख्याली - नस्त्री . बद अम्मल ; व्यभिचार . [ फा ] ख्याल ली - वि . बदफैल ; व्यभिचारी .
०गोई  स्त्री. अपभाषण ; निंदा . लाइणी - बद - गोई केली . - रा २० . २२० . [ फा . ]
०दिली  स्त्री. 
भ्याडपणा .
वहीमखोरी .
०दील वि.  
भ्याड .
संशयी ; वहीमखोर . - हिंब २६१ . [ फा . ]
०दुवा  स्त्री. बेदुवा ; शाप . बद - दुवा दिल्ही कीं या दोघांचा खाना खराब . - मदरु १ . ११८ . [ फा . ]
०नकशा   क्षा क्ष नाम नामी - पुनस्त्री . पाणउतारा ; मानखण्डना ; दुर्लौकिक ; अप्रतिष्ठा ; बेअब्रू . लोकांत बदनक्ष होय तें न कीजे . - रा ८ . २१३ . [ फा . ]
०नजर  स्त्री. 
वाईट दृष्टि ; कुवासना . दर्यामध्यें टोपीकरांची बद - नजर . - वाडमा १ . ३४० .
वैर . - ख ७ . ३५६६ .
बेभरवंसा ; बेविश्वास . [ फा . ]
०नाम वि.  बेअब्रू असलेला , झालेला ; मानखण्डित ; कुप्रसिद्ध . पुढें ऐसी बद - रहा वर्तणूक करुन बद - नाम न होणें . - रा १५ . ३८१ . [ फा . ]
०नियत   नेत नेक - स्त्रीपु . स्वामिद्रोह ; हरामखोरी . महाराजांचे पायाशीं सेनापतीनें बदनेत धरिला . - मराचिथोशा ४९ . [ फा . ]
०नियती वि.  स्वामिद्रोही ; दुष्ट हेतूचा . परन्तु जैपूरवाला प्रतापसिंग बद - नियती . - जोरा ९ .
०फैल  पु. 
कुकर्म ; दुर्वर्तन ; दुर्व्यसन .
स्वामिद्रोह . नाहींतर बदफैल करुन फन्द कराल तर जावली मारुन तुम्हांस कैद करुन ठेऊं . - ऐस्फुले १ . २४ .
वि.  कुकर्मी ; रंडीबाज . [ अर . फिअल = कर्म ] फैली - स्त्री .
बदफैलाचें कर्म ; ( मुख्यत्वें ) रंडीबाजी ; सोदेगिरी .
गैरवर्तन .
वि.  कुकर्मी ; व्यभिचारी ; पापाचरण करणारा .
०बोई   बोय - स्त्री .
घाण ; दुर्गंध .
( ल . ) बेअब्रू ; अपमान ; दुर्लौकिक . [ फा . बदबू ]
०मस्त वि.  
गर्वानें मत्त झालेला ; धुंद ; उन्मत्त .
बंडखोरे . गलीम बहुत बदमस्त जोरावर जाहला . - पाब १२ . [ फा . ]
०मस्ती  स्त्री. 
उद्धटपणा ; ताठा ; अभिमान ; मगरुरी ; अरेरावी .
बंडखोरी ; बंड . [ फा . ]
०मामला   ली - पुस्त्री .
कहराचें व दंडेलीचें वर्तन ; दांडगाई ( मुख्यत्वें पैशाच्या मागणीचा प्रतिकार करणारांचें ).
अन्याय . साष्टीचें ठाणें इंग्रजानें बदमामली करुन घेतलें . - वाडसमा २ . १९ .
हरामखोरी ; बेइमानी .
गोंधळ ; अव्यवस्था .
भित्रेपणा . - वि .
लुच्चा ; हरामखोर . इंग्रज फार बद - मामली आहेत . - रा १२ . ६ . [ फा . ]
०मास    - वि .
वाईट रीतीनें उपजीविका करणारा .
( ल . ) दुराचरणी ; गुंड ; पुंड . [ फा . मआष = उपजीविका करणारा ]
०माशागिरी  स्त्री. गुंडगिरी ; पुंडपणा .
०रंग  पु. 
नष्ट , भग्न झालेला मान , ऐश्वर्य , थाटमाट .
ऐश्वर्य इ० च्या भंगानें झालेला अपमान ; मानखंडना ; उपहास .
बेरंग .
०रस्ता   रहा राह - पु . वाईट किंवा गैर चाल , बर्तन ; अन्याय . हे बदरहाची कैफियत . - ख ७ . ३५७० . [ फा . ] बदराई राह हा ही - वि .
बदकर्मानें वागणारा ; कुमार्गी . बदराईच्या पाडी दाढा । लागे तुकयाचा हुंदाडा । - तुगा २८२४ .
क्रिवि . कुमार्गानें . कोणी बद - राहू वर्ततील तर तुम्हां लोकांनीं बुद्धिवाद सांगावा . - रा ८ . १२६ . [ फा . ]
०लाम   नाम नामी बदलौकिक वकर वकरी वक्र वक्री - नपुस्त्री .
दुर्लौकिक ; बेअब्रू ; अपकीर्ति ; बदनामी .
अयोग्य आरोप ; दोष ; ठपका ; दुर्निमित्त . ( क्रि० घालणें ; ठेवणें ; आणणें ; येणें ). - वि . कलंकित ; दर्लौकिक झालेला . आम्हास बदलाम करुं नये . - ख १० . ५६२९ . नबाब बुद्धिवन्त होत्साता हे बुद्धी वृद्धापकाळीं करुन बद - वक्र करुन घेतला . - ब्रप ४५ . [ फा . ]
०वख्त वि.  दुर्दैवी . [ फा . ]
०सलूक   पुस्त्री . गैर वर्तणूक ; अन्याय . [ फा . ]
०सल्ला  स्त्री. वाईट मसलत .
०सल्लागार  पु. वाईट मसलत देणारा . [ फा . ]
०सुरत वि.  अवलक्षणी मुद्रेचा ; कुरुप . [ फा . ]
०सूर वि.  वाईट स्वराचा , आवाजाचा ; बेसूर ( गाणें , वाद्य ). [ फा . ]
०हवई  स्त्री. 
खोटी बातमी ; हवेंतील गप्प . - वि . विशेष खोटी ; अगदींच वार्‍यावरची . अशा बदहवई आवया उठवितील त्यांत जीव नाहीं . - ख १ . १९३ . [ फा . ]
०हवा  स्त्री. दुर्दिन ; वाईट हवा . [ फा . ]

बद     

Shabda-Sagara | Sanskrit  English
बद   r. 1st cl. (बदति) To be steady or firm.
r. 1st and 10th cls. (बदति-ते बादयति-ते)
1. To speak.
2. To declare or communicate informa- tion; in these two senses, the root is more commonly and correct- ly written वद .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP