Dictionaries | References

बडवणी

   
Script: Devanagari

बडवणी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

बडवणी

  स्त्री. 
   ताडन करणें ; मारणें ; झोडपणें ; आपटणें .
   बडवण्याचें , मारण्याचें हत्यार . ) ( चोपण्याझोडण्याची काठी इ० )
   जोंधळ्याचीं अगर बाजरीचीं कणसें बडवून दाणे काढणें . [ ध्व . बडविणें ] बडवणें - न . बडवण्याचें साधन ; ठोकणें ; चोपणें ; सोटा . बडवणें , बडविणें - सक्रि .
   चिरडणें ; ठोकणें .
   झोडपणें ; मळणें ( धान्य ).
   काठीनें मारणें ; दांडकणें . ( गो . ) बडवचें , बडौचें .
   खच्ची करणें ( बैल इ० चा अंड एका भक्कम दोरीनें आवळतात . आणि दोराच्या दोन्ही बाजूस दोन मुसळें बांधतात , वृषणाच्या खालच्या मुसळावर पाय ठेवून वरचें मुसळ वर ओढतात . व पहारीनें वृषणाच्या शुक्रवाहिनी शिरा ठोकतात . त्यामुळें वीयस्तंभन होऊन वृषण बारीक होतें ).
   जोरानें आपटणें ( चिरगुटें - दगडावर धुतांना ).
   लांब , लंबे करणें . [ सं . वृध ; का . बडि ] बडवण्या - स्त्रीअव . ( जोराच्या पडणार्‍या सरीवरुन ) मूळ नक्षत्रावर पडणारा पाऊस . बडवा , व्या - पु . पंढरपूरच्या विठोबाचा ब्राह्मण पुजारी . कुसुम वाटिके माजी बाळ । बडवियासंगें पातलामु हरिश्चंद्राख्यान ३८५ . [ बडविणें , ठोकणें , दांडकणें - देवाभोंवती गर्दी करणार्‍यांना बडवे काठीनें बडवून मागें सारतात ] बडव्याचा - वि . झोडलेला ; काठीनें बडविलेला . याच्या उलट खळ्याचा तुडविलेला ; ( धान्य , दाणा ). [ बडविणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP