Dictionaries | References

निवटणे

   
Script: Devanagari

निवटणे     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : कापूस वठणे

निवटणे     

उ.क्रि.  ( काव्य ) ठार मारणे ; नष्ट करणे ; निर्मूळ करणे ; तोडणे ; कापणे . कां करुणा केलि हाली । विजयश्री निवटिली । - भाए १११ . निवटिला राहूचा घसा । - एभा ४ . २३४ . दुःशासने निवटिला पडला लोकक्षयी जसा तरणी । - मोकर्ण ४ . ७ . [ सं . निवर्तन ]
अ.क्रि.  स्वच्छ करणे ; शोधणे ; निवडणे ( कापसांतील सरकी ). [ नि + वटणे = सरकी काढणे ; निवडणे ]
अ.क्रि.  १ फुटण्याच्या बेतांत असणे ; पूर्ण भरदार , पक्व होणे ( फळ , गळूं इ० ). २ प्रसिद्ध होणे ; नांवालौकिकास चढणे ; पुढे येणे . ( चांगल्या किंवा वाईट रीतीने ). हा सोदेगिरीत निवटला . ३ तज्ज्ञ , निपुण होणे . गदायुद्धी भीमसेन । निवटला अर्जुन शस्त्रास्त्री । - पांप्र १० . ५५ . ४ स्पष्ट रीतीने निश्चित होणे ; उमगणे ; उघडकीस येणे ( काम , गोष्ट , मसलत ). [ नि + वठणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP