Dictionaries | References

नटणे

   
Script: Devanagari

नटणे     

क्रि.  मेकअप करणे , रंगणे , बेष घेणे , वेषभूषा करणे , सजणे .

नटणे     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
verb  अलंकार, वस्त्रे इत्यादिकांनी सुशोभित बनणे   Ex. लग्नात रश्मी खूप नटली होती.
HYPERNYMY:
काम करणे
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
सजणे
Wordnet:
asmসাজোন কাচোন কৰা
bdसाजाय
benশৃঙ্গার করা
gujસજવું
kanಅಲಂಕೃತನಾಗು
kasبَناو سٕنٛگارکَرُن
kokनटप
malഒരുക്കുക
mniꯃꯀꯦ꯭ꯁꯦꯝꯕ
nepरम्रिनु
oriସୁସଜ୍ଜିତ ହେବା
panਸਜਣਾ
sanउपसाधय
tamஒழுங்குப்படுத்து
urdسجنا , سنورنا , سنگارکرنا , آرایش وزیبایش کرنا

नटणे     

क्रि.  नाकबूल जाणे ( विशेषतः लबाडीने ). २ नाकारणे ; मान्य न करणे ; कचरणे ; कांकू करणे . हा पांच रुपयाला नटला . [ हिं . नटना = नकार दर्शविणे ]
अ.क्रि.  १ सजणे ; वेषभूषा करणे ; अलंकार , वस्त्रे इ० कांनी सुशोभित बनणे . अगनावेष येतो नटून । रंग तुझा लुटावया । - नव २० . १०८ . २ ( एखाद्याचा ) वेष , रुप , धारण करणे ; भूमिका घेणे . तै साकारपणे नटे नटी । कार्यालागी । - ज्ञा ४ . ४८ . तुझे प्रतिबिंबस्वरुप जाण । स्वये नटेल हुताशन । - रावि १५ . १३६ . मी अज अजित सर्वेश्वर । मीच नटलो चराचर । ३ खेळणे ; नाचणे . जैसा गोकुळी त्रीकुटामाजि कैसा । ४ डौल मिरविणे ; दिमाख दाखविणे . तयां कर्मत्यागु न घडे । जे कर्तव्य मनी सांपडे । वरी नटती ते फुडे । दरिद्री जाण । - ज्ञा ३ . ६५ . ५ ठमकणे ; नखर्‍याने ; नटूनथटून , ठमकत चालणे . - उक्रि नाचविणे ; खेळविणे ; खेळ दाखविणे . स्वमायेचे आड वस्त्र । लावूनि एकला खेळवी सूत्र । बाहेरी नटी छायाचित्र । चौर्‍याशी लक्ष । - ज्ञा १८ . १३३०३ . [ सं . नटन ] नटूनथटून - क्रिवि . १ दिमाखाने ; डौलाने ; ऐटीने . २ सजून ; थाटमाट , नट्टापट्टा करुन . ( क्रि० चालणे ; बसणे ). नटुनि थटुनि नाचति हे सौभद्र अंक ५ . [ नटणे द्वि . नटणे + थटणे ] नटतकळा - स्त्री . नाट्यकला . भरतशास्त्र नटतकळा । ताळस्वर भेद सकळा । - निमा १ . १४८ . [ नटणे + कळा = कला ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP