Dictionaries | References

ध्वनी

   
Script: Devanagari
See also:  ध्वनि

ध्वनी

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  लवचीक माध्यमांतल्यान वितरायिल्ली यांत्रीक थरथर   Ex. सगळेच ध्वनी आमकां आयकूंक येनात
ONTOLOGY:
भौतिक प्रक्रिया (Physical Process)प्रक्रिया (Process)संज्ञा (Noun)
   see : आवाज, आवाज, आवाज, नाद

ध्वनी

 ना.  आरव , आवाज , नाद , निनाद , रव ;
 ना.  आगळा सूर , गर्भितार्थ , सुचितार्थ .

ध्वनी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  श्रवणेंद्रियाद्वारे जाणवणारी संवेदना   Ex. एखाद्या गोष्टीवर आघात केल्याने ध्वनी निर्माण होतो.
ONTOLOGY:
बोध (Perception)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

ध्वनी

   पुस्त्री . १ श्रोतेंद्रियास आकलन करतां येणारा शब्द ; आवाज . देखा काव्य नाटका । जे निर्धारितां सकौतुका । त्याचि रुणझुणती क्षुद्रघंटिका । अर्थध्वनि । - ह १ . ७ . परब्रह्मी उठली जे ध्वनी । आदिजननी तेचि तूं । - ह १ . १३ . २ वाच्यार्थाहून इतर अर्थ सूचित करण्याचा वाक्य इ० कांच्या ठायी असलेला गुण ; गर्भितार्थ . काव्याचा व्यंगार्थबोधक एक प्रकार . ३ स्पष्टपणे न ऐकिलेले वाक्य इ० ; संदिग्ध , संशयित गोष्ट ; संशय ; अफवा ; कुजबुज . तरि अगा ऐशिया ध्वनी । झणे थारा देशी हो मनी । - ज्ञा ८ . १२३ . हा चोर आहे असा ध्वनि मात्र आम्ही कर्णोपकर्णी ऐकतो परंतु आमचा निश्चय होत नाही . ४ भावार्थ ; अभिप्राय ; सूचित , ध्वनित केलेला अर्थ . हे अष्टधा भिन्न कैसी । ऐसा ध्वनि धरिसी जरी मानसी । - ज्ञा ७ . १७ . ५ ज्यापासून निश्चित असा अर्थ स्पष्ट होत नाही असे संदिग्ध , मुग्धार्थयुक्त वाक्य . आजपर्यंत सरकारांत दादच नव्हती पण आतां चोरांचे परिपत्य करितो असा नुकताच ध्वनि निघाला आहे , होईल तेव्हा खरे . [ सं . ]
०द्वार  न. श्वासनलिका . [ ध्वनि + सं . द्वार ]
०प्रक्षेपक   - न . ध्वनि दूरवर वाहून नेणारे यंत्र ; ( इं . ) ब्रॉडकास्टिंग मशिन . [ ध्वनि + सं . प्रक्षेपक = फेंकणारे यंत्र ]
यंत्र   - न . ध्वनि दूरवर वाहून नेणारे यंत्र ; ( इं . ) ब्रॉडकास्टिंग मशिन . [ ध्वनि + सं . प्रक्षेपक = फेंकणारे यंत्र ]
०मंजूषा  स्त्री. कंठनाल ; नरडे ( इं . ) व्हॉइसबॉक्स .
०लेखनयंत्र   ध्वन्यनुकारी यंत्र - न . मेणाच्या , कथिलाच्या फिरत्या तबकडीच्य पृष्ठभागावर ध्वनीचे लेखन करुन , त्या मूळच्या ध्वनीस पाहिजे तेव्हा उत्पन्न करुन देणारे यंत्र . ( इं . ) फोनोग्राफ . - ज्ञाको ( ध ) ८८ . [ ध्वनि + सं . खक = लिहिणारे + सं . अनुकारी = अनुकरण करणारे + यंत्र ]
०विकार  पु. आवाज बसण्याचा एक विकार , रोग . [ ध्वनि + सं . विकार = रोग ]
०विद्या   शास्त्र स्त्रीन . ( इं . ) अकॉस्टिक्स . [ ध्वनि + सं . विद्या , शास्त्र ] ध्वन्यर्थ पु . ध्वनित , सूचित केलेला , गर्भित अर्थ ; व्यंगार्थ . [ ध्वनि + अर्थ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP