-
to exhibit the folly of judging of matters in the gross or general whilst, in fact, man has always to deal with particulars or singulars. 4 सरासरी is sometimes used as a in the sense Common, ordinary, middling: also in the sense Mean, poor, very so so. 5 सरासरी is sometimes used as s f in the sense Average; also in the sense General quality or character resulting from the mixture of various ingredients or constituents. v कर, बांध, & हो, बस, जम, मिळ.
-
स्त्री. १ सामान्य प्रमाण ; सरसकट पडणारे प्रमाण ; सर्वांचे मिश्रण करून येणारे सामान्य गुणधर्म , लक्षण . ( क्रि० करणें ; बांधणें ; होणें ; बसणें ; जमणें ; मिळणें ). २ ( गणित ) अनेक सजातीय संख्याच्या बेरजेस त्यांच्या संख्येने भागून येणारें प्रमाण . - क्रिवि . १ सामान्यतः ; साधारणतः ; सरसकटपणें ; विशेष बारकाई , चिकित्सा न करतां ; कसें तरी ; यथाकथंचित . २ अजमासनें ; कल्पनेनें ; साधारण अंदाजानें ; ठोकळ मानानें ; वरवर पाहतां ; बिनचूक निश्चय न करतां . या घरास सरासरी हजार रुपये खर्च येईल . ३ मध्यम मानानें ; सर्वाचा सम प्रमाणानें हिसोब करून ; सर्वावर सारखे वाटून . ४ सर्वस्वी ; पूर्णपणें ; एकंदरीत . आधी तुम्हीच सरासरी हरामखोरी केलीत । - रा १५ . ३७१ . ५ ( विशेषणाप्रमाणें ) सामान्य प्रतीचें मध्यम प्रतीचें कसेंबसें ; चालचलाऊ . म्ह० सरासरी गुडघाभर नदीच्या पात्राचें एकंदर पाणी पाहून त्याची सरासरी काढलेली खोली . अर्थात ही व्यवहारास निरुपयोगी आहे - कारण मध्यें पाणी खोल असणारच .
-
ad Anyhow; conjecturally; in the average.
-
क्रि./वि.ना. ठोकळमान , वरवर पाहता , सरसकटपणे ;
Site Search
Input language: