Dictionaries | References

दुम

   
Script: Devanagari
See also:  दुयम , दुय्यम , दुवम

दुम     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : पूँछ, पिछलग्गू

दुम     

वि.  दुय्यम पहा . दुमजला , ली - वि . दोन मजल्यांचे ( घर ); दोन मजले डेक असलेले ( जहाज , आगबोट इ० ); दुहेरी ; दोन कांठ , संजाफ असलेले ( वस्त्र इ० ). [ दु + मजला ]
 स्त्री. शेंपूट ; पुच्छ . [ फा . दुम ]
वि.  मध्यम ; दुय्यम . [ फा . दुयुम ]
०करणे   धूम ठोकणे ; पळ काढणे ; पाठ दाखविणे . म्हणती ठकडा रे कान्हा । लावी घांस भरी राना । दुम करि तो शहाणा । पाठोवाठी तयाच्या । - तुगा २३० .
०दार वि.  शेंपूट असलेला ; सपुच्छ . [ फा . दुम्दार ] दुम्दारी स्त्री . १ पाठपुरावा ; मदत ; पाठबळ . ( क्रि० ठेवणे ; राखणे ). घोरपडे दुमदारीस होते . - शिचप्र ४४ . २ पिछाडी . कडपेकरांचे पथक दुम्दारीस नेमून होते . - ख ४ . १८३७ . दुमदारीस सरलष्कर वगैरे सरंजामी पथके नेमून दिले . - मराचिथोशा ६० . ३ पिछाडीची फौज . पाठीमागील दुम्दारी अस्तमानचे सुमारास जागा सोडून गेली . - ख ८ . ४०२६ . [ फा . दुम्दार ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP