-
पु. अखेर ; परिणाम ; अंत ; समाप्ति ; अंतिम अवस्था . १ - न . टोक ; अग्र ; कड ; कडेचा भाग ; अंतिम भाग . २ बंदुकीचा तोडा . [ सं . सीमन् - सीमा ] शेवट घेणे - अखेरीस नेऊन पोचविणे ; संपविणे ; समाप्त करणें ; अखेर करणे शेवटचा - वि . १ अखेरचा ; अंतिम . २ सर्वांत धाकटा . शेवटचा आदितवार - पु . कधीहि न येणारा दिवस .
-
०च्याआदितवारी कधीहि नव्हे ; कदापि न ; केव्हाहि नाही . शेवटची पालखी - स्त्री . प्रेताची तिरडी . शेवटच्या बांधण्यास पाणी मोडणे - अखेरच्या अटी सांगणे ; कमाल मागणी करणे ; अंतिम हेतु कळविणे . सरशेवटी - अखेरीस , सर्व संपल्यावर ; अंतिम अवस्थेमध्ये . शेवटणे - अक्रि . १ टोक काढणे ; बोथट झालेले टोक ( छिनी वगैरेचे ) तीक्ष्ण करणें ; धार लावणे . पहार शेवटायला हवी होती . २ घोडयास वगैरे चाबकाच्या अग्राने किंचित मारणे . ३ ( राजा . ) टोकांस , शेवटास लागणे ; चांटून ; घासून जाणें ( गोळी , तीर , नेम वगैरे ). ५ शेवटी येणे , अखेरीस होणें , घडून येणे . परिपरिणामी शेवटे । अवश्य मरण । - ज्ञा १८ . २४९ शेवटता - क्रिवि . निसटता ; घासून जाणारा ; चाटून जाणारा ; चुटमुटका . ( क्रि० लागणे ; जाणे ). शेवटाला , शेवटील - वि . अखेरचा ; अंतिम ; शेवटचा . शेवडा - वि . ( राजा . ) गांवाच्या शेवटी राहणारा . शेवडे हे आडनांव परांजपे , आपटे , गोखले या चित्पावन व एका कर्हाडा घराण्याचें आहे . शेवटोर - क्रिवि . शेवटपर्यंत ; अखेरपावतों . सकळ राज्य तंत्रहि डबीर नारोपंताचे स्वाधीन करून शेवटोर ही चालवीत आले - तंजावर शिलालेख ९६ . २३ . [ शेवटवर ]
-
ना. निकाल , परिणाम ;
-
ना. अंत , अखेर , इतिश्री , समाप्ती ;
Site Search
Input language: