Dictionaries | References

झक

   
Script: Devanagari

झक     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : साफ, चमकीला, सनक

झक     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A word introduced from the Hindustání, and, though much used in the senses here given, unknown in its primitive signification, that of Fly. Ex. झक मारणें To err or blunder; to act or speak like a fool. झक मारीत-जाईल-देईल- येईल-करील &c. implies He will go, come, give, do &c. willy nilly; he cant help himself. It corresponds with other vulgar phraseologies in this flowing tongue. See under केळें.

झक     

 स्त्री. झांक ; चमक ; दिपविणारा प्रकाश . झक पडे नयनीं । जाय निघोनि । - दावि १७८ . - वि . झक्क ; भपकेदार ; चकचकीत ; झगझगीत ; लख्ख . झळकत झक झळ घनदामिनी । - दावि ४९६ . [ ध्वनिसादृश्यावरून अनुकरणवाचक शब्द ; सं . चकास , चक्क ; हिं . झक = साफ , चकचकीत , चमक , झांक ]
 स्त्री. १ ( ह्या शब्दाचा निराळया अर्थी उपयोग होतो . पण मूळचा अर्थ सं . झष = मासा यावरून निघाला असावा ). मासा . २ ( ल . ) वाईट गोष्ट ; निंद्यकर्म . [ सं . झष = मासा ; हिं . झक = मूर्खपणा ; पागलपणा ; सं . झष = मारणें , दुखविणें ; अर . झक = फसविणें ] ( वाप्र . )
०मारणें   ( अशिष्ट ) १ ढोबळ चूक करणे ; मूर्खाप्रमाणें वागणें . २ निंद्यकर्म , व्यभिचार इ० करणें ; लोकसंप्रदायाविरुध्द वागणें . तो आईबापांचें ऐकत नाहीं , झक मारतो . ३ करूं नये ती गोष्ट केली असें कबूल करणें किंवा कबूल करून तिच्याबद्दलचा दोष आपल्या पदरांत घेणें . मी तुझ्या कारभारांत पडलों , झक मारली . एखादी गोष्ट झक मारीत , झकत करणें , झक्कत करणें , झकत जाणें , झक्कत जाणें , झकत देणें , झक्कत देणें , झकत येणें , झक्कत येणें - इच्छा नसतांहि नाईलाज म्हणून करणें - जाणें इ० आपसुख . चुंबीत करणें इ० या भरवसेनें दवडिलें लुब्धा । येईल झकमारु म्हणोनि । - दावि ४४० . झकत पहा . झकमारीत राहणें - भीक मागणें ; नाइलाज म्हणून हात चोळीत बसणें ; बोंबलत राहणें . मागें दौलत किल्ले स्वामींचे स्वामी घेतील . कर्जदार झक मारीत राहतील . - ख १ . १७७ . [ तुल० अर झकात = भिक्षा ] झक मारून झुणका खाणें - ( क . ) झकमारणें ; मूर्खपणा करणें ; झकचे आणखीहि ग्राम्य अर्थ आहेत .
०कण   कन कर दिनीं दिशीं - क्रिवि . एकदम चमकून ; तेज पाडून ; झकाकत ; लकाकत .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP