Dictionaries | References

जाहीरा

   
Script: Devanagari
See also:  जाहिर , जाहिरा , जाहीर

जाहीरा     

वि.  १ सर्वश्रुत ; प्रसिध्द ; सर्वास कळविलेलें ; व्यक्त . ते खबर जाहीरा होऊनु . - रा १५ . २७४ . २ सार्वजनिक रीतीनें प्रख्यात . ३ विदित : माहीत . हे खबर च्यारो पादशाहासी जाहीर जाहाले . - इम १३ . ४ छापील ; प्रकाशित . [ अर . झाहिर ]
०खबर  स्त्री. जाहिरात ; नोटीस . जाहीरणें - १ प्रसिध्द होणें . २ उघड होणें . अथर्वण खोटा जाहीरला . - रा ८ . ४३ .
०दारी  स्त्री. १ प्रसिध्दी . २ बाह्य देखावा ; बाह्यात्कार . जाहीरदारीनें सफाई ठीक नाहीं . दिलापासून साफ व्हावें . - रा ५ . १६७ . ३ बाह्य सलोखा ; वरपांगी मैत्री . सरदारांशीं आपसांत चित्तशुध्दता नाहीं , जाहीरदारी मात्र परस्परें आहे . - दिमरा १ . ३१८ . ४ जाहिरी ; प्रसिध्दि . अद्यापि मसलतीचें वर्तमान जाहीरदारींत आलें नाहीं . - दिमरा १ . २०९ .
०नामा  पु. १ प्रसिध्दि ; डांगोरा ; दवंडी . २ जाहीर केलेला लेख ; सरकारचें प्रसिध्दीपत्रक ; नोटीस . ३ ( पाटबंधारे खातें ) मुख्य पिकांत जें दुसर्‍या जातीचें पीक थोडें थोडें मिसळलेलें असतें तें .
०सभा  स्त्री. जाहीर ठिकाणीं भरलेली सभा ; सर्वांना जेथें येण्यास आडकाठी नाहीं अशी सभा . जाहिराणा , जाहिरी - पुस्त्री . प्रसिध्दि ; उघडीक ; जहूर . ही गोष्ट आपणास कळावी म्हणून लिहिलें आहे , जाहिराण्यांत आणूं नये . - ख ८ . ३९२५ . - क्रिवि . प्रसिध्दपणें ; उघडपणें - रीतीनें ; लौकिकांत . परंतु जाहिराणा तर यादीप्रमाणेंच कबूल करावें म्हणतील . - रा १२ . १२४ . जाहिरात - स्त्री . १ प्रसिध्दीपत्रक ; जाहीरनामा ; प्रसिध्दीचें साधन . २ स्वत : तयार केलेल्या अथवा आणविलेल्या मालाचीं किंवा स्वत : च्या धंद्याचीं वृत्तपत्रें ; भिंतीवरील बोर्ड , माहितीपत्रें , कॅटलॉग वगैरे साधनामार्फत जी प्रसिध्दि केली जाते ती . विसावें शतक हें जाहिरातीचें युग आहे . ३ कळविणें ; प्रसिध्दि देणें . ( क्रि० देणें ; करणें ; लावणें ). - क्रिवि . प्रसिध्दपणें . जाहिरात अगर अन्तरगती या गोष्टीस त्याचें अनुमत नसावें . - रा १२ . १२३ . [ अर . झाहिरात ] जाहिरी - स्त्री . प्रसिध्दि ; जहूर . यकसखुनीपणाची नेकी व खुबी सर्व टोपीकरांत जाहिरीस येई तें करणें वाजीब व लाजीम आहे . - रा १० . २८० . जाहिरींत - क्रिवि . बाह्यत :. जाहिरींत बहुत स्नेह दाखवून , - दिमरा २ . ९४ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP