|
न. १ जळ अर्थ १ व जळप ( - स्त्री . ) पहा . धातू तापविण्यांत किंवा वितळविण्यांत आलेलें नुकसान . ( क्रि० जाणें ). २ जळालेलें घर , गंज , पीक इ० अग्नीनें झालेलें कोणतेंहि नुकसान . ३ अन्यायानें लादलेला कर , दंड , ओझें ; भुर्दंड पहा . त्याचा पैका मीं खाल्ला नसतां पन्नास रुपये उगीच जळीत द्यावे लागले . ४ जाळण्याकरितां ठेवलेला पदार्थ ( सरपण , गवत इ० ). [ सं . ज्वल ] ( वाप्र . ) ०जाळणें अन्यायानें त्रास देणें ( जें जळलें आहे किंवा जळत आहे तेंच पुन्हां जाळणें ). सामाशब्द - ०खत पु. १ कुळाकडून येणें राहिलेली बाकी आल्यानंतर त्या कर्जखतास किंवा दस्ताऐवजास म्हणतात . २ सदर बाकी मिळत नाहीं असे दिसून आल्यावर त्या बाकीसंबंधीं जवळ असलेलें करारपत्रक ; बुडीत रकमेचें खत . ०बाकी स्त्री. १ बाकी राहिलेला , यावयाचा पैसा ( रयत , कूळ याजकडील ). २ जी परत येण्याची आशा नाहीं अशी बाकी .
|