|
स्त्री. दरार ; वरचढपणा . जबर त्यांची सबसे ज्यादा गादीवर दवलतराव शिंदा । - ऐपो १५२ . - वि . श्रेष्ठ ; ताकतवान ( माणूस , पशु ) जोराचा ; सोसाटयाचा ( पाऊस , वारा ); कठिण ; त्रासदायक ( काम , ओझें ); जंगी ; मोठें ( घर , नदी , झाड ); उभट ; कठिण ( चढ , चढण ); देण्यास कठिण ; फार अवाढव्य ( किंमत , दर ); दुर्घट त्रासदायक ( रोग ); लांबलचक ; कंटाळवाणा ( रस्ता , मार्ग , प्रवास ); अगडबंब , अवजड ( दागिना ) ( प्रमाणराहित्य आणि प्रचंडपणा दाखविण्यासाठीं योजतात ). [ अर . जब्र . फा . झबर ] सामाशब्द - ०जंग पु. लहान तोफ . - वि . शूर ; जवानमर्द ; लढवय्या . [ अर . जब्र + फा - जंग ] ०दस्त वि. १ जुलुमी ; अन्यायी ; दडप्या . २ श्रेष्ठ ; मजबूत ; बळकट ; मोठया योग्यतेचा याच्या उलट जेरदस्त . ३ अदलाबदलीनें जबर बरोबर योजतात . [ फा . झबर्दस्त ] म्ह० ( व . ) जबरदस्तका ठेंगा शिरपर = जबरदस्तापुढें कुणाचेंच चालत नाहीं . ०दस्ती स्त्री. १ जुलूम ; जोर ; अन्याय ; बलात्कार . इंग्रजांची जबरदस्ती सर्वांवर पडली असें वाटतें . - ख ११ . ६०३० . २ आवेशाचें कृत्य , यत्न ; श्रम . जबरदस्तीनें नदी डोंगरावरून नेली . जबरा - पु . ( छापखाना ) मोठा टाईप ; मजकुरांतील स्थलनामें व व्यक्तिनामें या टाईपांत घेण्याची वहिवाट आहे . जबरी - स्त्री . जबरदस्ती . पादशाही जबरीनें घेईल . - चित्रगुप्त पृ . ३४ . [ फा . झबरी ] जबरीची चोरी - स्त्री . ( कायदा ) दरोडा ; कोणा मनुष्यास जीव घेण्याची वगैरे भीति घालून त्याच्यासमक्ष त्याच्या ताब्यांतून जंगम माल नेणें . जबरीसंभोग - पु . ( कायदा ) कोणा स्त्रीशीं तिच्या सम्मतीवांचून किंवा भय घालून मिळविलेल्या संमंतीनें किंवा नवर्याचें नातें आहे अशी फसवणूक करून केलेला संभोग ; बलात्कार .
|