|
पु. १ समुद्र , वारा , नदीचा प्रवाह , पूर इ० कांचा आवाज , गर्जना . घो घो शब्दें पूर चालला । - नरहरि गंगारत्न माला कटाव ( नवनीत पृ . ४२५ . ) जीवजंतु घो घो शब्द करूं लागतात . - पाव्ह ५६ . २ ( गो . ) धबधबा . - क्रिवि . १ लाटांच्या आपटण्याच्या , वार्याच्या , घोंघावण्याच्या , पावसाच्या गर्जनेच्या आवाजाप्रमाणें शब्द करीत , होत . २ ( मनुष्यांच्या घोळक्याच्या ) गोंगाटाच्या , गलबल्याच्या , गलक्याच्या ; आवाजाप्रमाणें ; खूप खेचाखेचीनें ; ( माणसें इ० कांनीं ) गजबजत ; पेव फुटल्याप्रमाणें घोंगावत ; घवघवां , घवघव पहा . [ घ्व . द्वि . ] न. एखाद्या पदार्थाभोंवतीं जमणार्या माशांच्या थव्याचा आवाज . [ घ्व . ]
|