Dictionaries | References घ घुगरी Script: Devanagari Meaning Related Words घुगरी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . Ex. घुगऱ्या वांटूनि निजप्रीतीनें ॥ आली रुक्मिणी राउळासी ॥. घुगरी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Grain (esp. the pulses) boiled whole, i. e. unsplit and unhusked.तुझ्या सठीच्या म्यां घुगऱ्या खाल्ल्या आहेत Teach not your elders, youngster! घुगरी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun न भरडता सालीसह शिजवलेले, विशेषतः द्विदल धान्य Ex. बारशाला घुगर्या करतात. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:hinघुँघनी kanಗುಗ್ಗರಿ घुगरी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ न . भरडतां , सालीसकट शिजविलेलें ( विशेषत : द्विदल ) धान्य ; शिजविलेले हरभरे , कडधान्य ; हरभर्याची उसळ . घुगर्या वांटूनि निजप्रीतिनें । आली रुक्मिणी राउळासी । २ ( व . ) चणे , तूर , वाटाणे इ० ची उसळ . ३ धान्याची , पिकाची मळणी झाल्यानंतर शेतकरी कमाविसदार , पाटील सरकार यांना जी धान्याची ( त्यांनीं घुगर्या कराव्या म्हणून ) नजर करतो ती ; हें एक प्रकारचें बलुतें आहे . धान्य खळयांत मळल्यानंतर शेतकरी गांवच्या अधिकार्यांस ( त्यांच्या ) हक्कादाखल देतो . यावरी पाटील कुळकर्णी याची । काय रीत परभारा नेमणुकीची । घुगरी किंवा बलुत्याची । ते लावणीवर कोणे विधी ॥ - पैमाषेंदु . ( एखाद्याच्या ) सटीच्या घुगर्या खाणें , खाल्लेल्या असणें - ( एखाद्या पेक्षां ) ज्ञानानें व अनुभवानें पुष्कळच अधिक चतुर व प्रौढ असणें ; वयानें मोठा असणें . ( सटीच्या दिवशीं - मूल जन्मल्याच्या सहाव्या दिवशीं - सटी देवीची पूजा करून तिला घुगर्यांचा नैवेद्य दाखवितात , आप्तेष्टांनाहि घुगर्या वाटतात , त्यावरून ) एखाद्याच्या सटीच्या घुगर्या खाल्लेला मनुष्य त्या ( दुसर्या ) मनुष्यापेक्षां अनुभवानें वयानें , ज्ञानानें पुष्कळच अधिक असणार . त्याला लहान माणसानें शिकवूं नये ). Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP