Dictionaries | References

घडीत

   
Script: Devanagari

घडीत     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Metal given to be forged or wrought: also an article forged or wrought. Pr. घ0 बुडवून घडणावळीचा तगादा. 2 The price or rate of working. Ex. हा तोळ्यास एक रुपयाचें घ0 मागतो. 3 unc Form, fashion, shape. Ex. ह्या डागिन्याचें घ0 चांगलें आहे.

घडीत     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Metal given to be forged or wrought. An article wrought. The price or rate of working. From.

घडीत     

 न. ( गो . ) विकून येणारी किंमत .
 न. १ घडण्यकरितां दिलेली धातु , धातूचा पत्रा , तुकडा , मोड इ० . २ घडलेला जिन्नस ; घडविलेला पदार्थ . ३ घडणावळ ; घडण्याची मजुरी . हा तोळयास एक रुपयाचें घडीत मागतो . ४ ( दागिन्याचा , भांडयाचा ) घाट ; घडण ; ढाळ ; रचना . चातुर्य वेंचे चतुराननाचें । घडीत आलें तव आननाचें । - सारुह २ . ३९ . म्ह० १ घडीत वुडवून घडणावळीचा तगादा = एका नुकसानींत दुसर्‍या नुकसानीची भर . २ करावयास सांगितलेलें काम न करून , बिघडवून कामाची मजुरी मागणें . [ घडणें = बनविणें ]

घडीत     

घडीत बुडवून घडणावळीकरितां तगादा
घडीत खाऊन घडणावळीकरितां भांडण
एखादा दागिना करण्याकरितां सोनाराजवळ सोने दिले असतां ते आटण्यात वगैरे नासून टाकून खाऊन बसावयाचे. दागिना तर घडवावयाचा नाही. पण न घडलेल्‍या दागिन्याबद्दलहि मजुरीकरिता तगादा लावावयाचा व भांडण करावयाचे, असला उलटा न्याय.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP