Dictionaries | References

गोरख

   
Script: Devanagari

गोरख

  पु. गुराखी ; गुरें राखणारा . २ गोरखनाथ ; गोरख ( कानफाटे ) संप्रदायाचा आदिपुरुष . [ सं . गोरक्ष ; प्रा . गोरख्ख ] सामाशब्द -
०गांजा  पु. तागाच्या किंवा भांगेच्या बुटाप्रमाणें बुटें येणारी औषधी वनस्पती . ही नळगुदावर देतात .
०चाळा   सांखळी - पुस्त्री . १ भोंवतीं कडया असलेला लोखंडी गज . हा गोसाव्यांच्या हातांत असतो . २ ( ल . ) संबंधाची गुंतागुंत ; परास्परावलंबन ( अनेक अंतर्विवाहांनीं कुटुंबीयांत , परस्पर जामीनकेनें गांवकर्‍यांत ; कुंपणांत , कांटेरी झुडपांत ).
०चिंच  स्त्री. एक प्रकारच्या चिंचेचें झाडफळ . हें मोठें असतें . फळांतील गीर पित्तशामक , रूचकर , पथ्यकारक आहे . २ गोरक्षी नांवाचें झुडूप .
०नाथ  पु. एक नाथपंथीय श्रेष्ठ पुरुष . मछिंद्रनाथाचा शिष्य . याचे संप्रदायी कानफाटे योगी होत .
०पंथी   मार्गी - वि . गोरखनाथाचा अनुयायी .
०मंत्र  पु. गोरखनाथानें उपदेशिलेला मंत्र .
०मुहूर्त  पु. गोरखनाथानें सांगितलेल्या अनेक मुहूर्तीस सर्वसामान्य शब्द .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP