Dictionaries | References

गुढार

   
Script: Devanagari
See also:  गुढर

गुढार

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

गुढार

  न. १ परचक्राला भिऊन गांवकरी लोकांनीं केलेलें पलायन ; दंग्यामुळें पळून आलेला मनुष्यसमुदाय .
  न. पाल ; खोंप ; झोंपडी . गुढर पहा . २ ( क . ) पालपट्टें ; हांथरी ; जाजम . गुढार बसावयाला घाल . [ गुढर ; का . गुडार ]
  न. १ हत्तीचें खोगीर ; कवच . एक हस्ती गुढर घालीत । - उषा ८२० . पृष्ठीं मिरवलीं गुढारीं । - कथा ४ . ९ . ४६ . २ हौदा ; अंबारी . रत्न - चाकें सुवर्ण गुढार । माजी शोभला लक्ष्मीवर । - मुसभा १ . ६५ . गुढरु घातला ऐरावतीवरी अठैजणी कन्या बैसती । - कालिका १७ . १४ . ३ डेरा ; राहुटी ; पाल . जैसें होति गुढरूं । अनंगाचे ॥ - शिशु २९० . [ सं . गुड = हत्तीचें कवच ; प्रा . गुडा ; का . गुडार = तंबू ]
  न. कोडें ; गुह्य गोष्ट . तुका म्हणे तूंचि निवडी हें गुढार । - तुगा ९३७ . [ सं . गूढ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP