Dictionaries | References

गटारयंत्र

   
Script: Devanagari

गटारयंत्र     

१. निराधार, खोट्या बातम्‍या उठविणारा
गप्पा मारणारा
अवाई उठवणारा. २. गांवातील कुटाळ लोकांची चकाट्या पिटण्याची चव्हाट्यावरील जागा. पूर्वी पुण्यात सायंकाळच्या वेळी बुधवारातील गटारांवरील फरशांवर बसून रिकामटेकडे लोक गप्पा मारीत असत भांग्‍यामारुती व सोमेश्र्वराच्या देवळांजवळहि गटारांवर बसून आचारी, पाणक्‍ये गांवातील लोकांच्या कुटाळ्या करीत असत, त्‍यावरून हा वाक्‍प्रचार पडला. ‘एकदोन वृत्तपत्रकारांनी या महाराजांचे जे इतिवृत्त दिले आहे, ते वाचले असतां गटारयंत्रावरील... भटांस जितकी त्‍यांच्या व्यवसायाखेरीज माहिती असते, तशीच माहिती या लेखकांना असावी असे दिसते.’-विवि.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP