Dictionaries | References

खास

   
Script: Devanagari
See also:  खांस , खांस खासी , खांसखांस , खांसखोंस , खांसणी , खांसर , खांसरी , खांसी

खास

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

खास

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 adjective  जितलें आसूंक जाय ताचे परस चड   Ex. हांव हांगा एका खास कामा खातीर आयलां / ह्या यज्ञा खातीर कांय खास सामनाची गरज आसा
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
   see : खाशेलें, असामान्य

खास

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A cough. v लाग.
   positively, assuredly, certainly. 2 exactly, precisely, nicely, just.
   Pertaining or relating to the king or state; governmental &c. 2 own, private, personal. In comp. as खासपतक, खासपागा. 3 pure, genuine, sterling, true, real, good. see compounds in order. other common ones, occurring, some, in the sense royal or public, some, in that of own or personal, some, in that of pure, true, real, good, are खासकोठी, खासखजाना, खाससरंजाम, खासजामदार, खासहुजुरात, खासजामीन, खासइनाम, खासनेमणूक.

खास

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  cough.
 ad   positively. exactly. pure.
   own.

खास

 क्रि./वि.  खाशानिशी , खुद्द , जातीने , स्वत : ;
 क्रि./वि.  खचित , खात्रीने , निखालस , निश्चयपूर्वक , निश्चित ;
 क्रि./वि.  उच्च , थोर , निवडक ;
 क्रि./वि.  अस्सल , खरा , चांगला , शुद्धा ;
 क्रि./वि.  खाजगी , स्वतःचे ;
 क्रि./वि.  मुद्दाम योजलेले , विशेष .

खास

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

खास

  स्त्री. ( हिं ) ढास ; खोकला . ( सं . कास = खासं ; प्रा . खास )
 क्रि.वि.  खचित ; निखालत ; खात्रीनें ; निश्चयपुर्वक . २ बरोबर , तंतोतंत . ३ खुद्ध ; स्वत ; जातीने ; - वि . १ राजा किंवा राज्यासंबंधी ; सरकारी . २ स्वतःचें खाजगी ; जातीचें . ( समासांत ) खासपथक ; खासपागा . ३ शुद्ध ; अस्सल ; खरा ; चांगला . ४ विशेष ; विशिष्ट . ५ निवडक ; थोरथोर ; उच्च . सामान्य सामासिक शब्द राजकीय अथवा सरकारी या अर्थाचं व कांहीं स्वतःचें किंवा जातीचे या अर्थाचें सरकारी या अर्थाचें व कांही स्वतःचें जामदार - हुजुरात - जमीन - इमाम - नेमणुक इ० ( आर . खास्स ) विशेष सामाशब्द .
०आमदानी  स्त्री. नियमित पीक , उप्तन्न यांच्या विरुद्ध शिवाई आमदानी = जादा पीक . ऐन अमदानी हा शब्दहि कधीं कधीं या अर्थानें योजतात .
०खबर  स्त्री. खात्रीलायक बातमी . २ सरकारी बातमी .
०खेल वि.  सेनाखासखेल ; सेनापति . ' एक सेनापती जन्मला । खासखेल सयन । ' - ऐपो ७९ .
०गत   खाजगत - वि . १ स्वतःचा आपला ; जतीचा ; खाजगी . ' आमच्या खासगत वाडा पुण्यास आहे .' २ मालक स्वतः जमाखर्च लिहित असल्यास हा शब्द तो आपल्या नांवामागें लावतो . ०क्रिवि . जातीनें ; खुद्द . ' मी खासगत त्यासंच रुपयें दिलें .'
०गत   राजश्री -( जमाखर्च ) मालकाच्या नावांमागे लावतात . ०गाडी राजश्री -( जमाखर्च ) मालकाच्यानांवामागें लावतात .
०गाडी  स्त्री. राजाचीकिम्वा स्वतःसाठी मुद्दम काढलेली ( स्पेशल ) आगगाडी . ' खाशांच्या स्वार्‍या खासगाडीनं अगर मोटारीनें जाण्याच्या असल्यास ...' - डुकराची शिकार ( बडोदें ) २ .
०जमीन  स्त्री. जमीनदार खुद्द करीत असलेली जमीन . २ जिचा वसुल प्रत्यक्ष सरकार वसुल करतें अशी जमीन
०नीस   खासनवीस - पु . खानगी कारभारी ; सर्कारी हिशेबनीस ; ( इं .) प्रायव्हेट सेक्रेटरी .
०निशी  स्त्री. त्याचें काम ' बाजी मुरार यांचे नातु हे खासनिशी करुन ... राहिलें ,' ०मराचिंस १ .
०पंतग  स्त्री. ज्या पंक्तींत यजमान जेवावयास बसतो ती पगत ; राजाची अथवा सरदारांची पंगत ; थोरथोर लोकांची पंगत . २उच्च जात ; शिष्ट वर्ग . ३ निवडक मंडळी .
०पथ    ) --- न . एखाद्याचें स्वतःचें खासगी घोडेस्वारांचें पथक ; ज्याच्या निशाणाखालीं हे घोडेस्वार चाकरी करितात आणि ज्याच्या खर्चानें ते ठेविले असतात त्याचें पथक ; खाशांचे पथक .
(    ) --- न . एखाद्याचें स्वतःचें खासगी घोडेस्वारांचें पथक ; ज्याच्या निशाणाखालीं हे घोडेस्वार चाकरी करितात आणि ज्याच्या खर्चानें ते ठेविले असतात त्याचें पथक ; खाशांचे पथक .
०पथ    ) की - वि . खासपथकांसंबंधी -( स्वार , शिपाई , घोडा ).
(    ) की - वि . खासपथकांसंबंधी -( स्वार , शिपाई , घोडा ).
०पागा  स्त्री. राजानें अथवा राज्यकर्त्यानें स्वत ; ठेवलेली आणि त्यांच्या हुकुमांतील घोडेस्वारांची टोळी ; घोडदळ .
०पाग्या  पु. १ खासपगेवरचा अधिकारी . २ खासपागेंतील घोडा किंवा स्वार .
०बंदी  स्त्री. खेड्यांतील कांही घरांण्यांत वाटेल तशी वांटुन दिलेली जमीन व प्रत्येकीच्या कांही ठोकळमानानें ठरविलेला सारा .
०बरदार   बार्दार बालदार - पु . राजा . सरदार किंवा मोठा माणुस यांची बंदुक वगैरे नेणारा सेवक . हिंमत बहादुर खासे बालदार ' ऐपो ३३३ .
०बातमी   वर्तमान - स्त्रीन सरकारी खबर .
०बारगीर  पु. राजा किंवा सरदार यांचा शरीरसंरक्षण स्वार .
०बाल  स्त्री. बाळु चिकणमाती यांच्या मिश्रणानें बनलेली जमीन . ही खतावल्यास चांगलें पीक देतें .
०बिघा  पु. खासबंदी गांवातील कुळांच्या जमिनीचा धारा ठराविण्याचें माप ; मोजणीमाप .
०महाल  पु. खाजगी महाल . २ विवाहित पत्‍न्तांत महाल ; राणीवसा . याच्या उलट खुर्द महाल ( रखेल्यांचा महाल ).
०स्वारी  स्त्री. राजा किंवा सरदार बांचा लवाजमा , मिरवणुक ; जिलीव ; त्याचप्रमाणें स्वतः राजा , अथवा सरदार , खाशींस्वारी पहा .

खास

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP