Dictionaries | References

कोळंबें

   
Script: Devanagari
See also:  कोळंभें

कोळंबें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   over grounds.

कोळंबें

  न. ( कों . गो . कु .) १ मातीचें , रुंद तोंडाचें भांडे ; फुलझाडांच्या कुंड्याकरितां , जनावरांना पाणी पाजण्यास व अंबोण ठेवण्यास याचा उपयोग करतात . २ रहाटाच्या लोट्यांचें पाणी ज्यांत पडतें असे रहाटाच्या मध्यें असलेलें लांकडी पात्र , डोणी . याची दोन्हीं तोंडें बंद असुन एका तोंडाजवळ खालच्या बाजुस भोंक असतें . व त्यांतुन पाणी आडनळींत पडतें . ३ विहिंरींतुन ओकतीनें पाणी काढण्याकरितां सुरमाडाच्या बुडख्याचें किंवा धातुचें पात्र केलेलें असतें तें ; पोहरा . ४ कुंडींतील अथवा पाटांतील पाणी बाहेर फेंकण्याकरितां सुपाच्या किंवा पावड्याच्या आकाराचें भांडें असतें तें ; शेलणें . ५ ( चांभारी ) चामडें भिजविण्याचें चांभाराचें खापरी अथवा दगडी पात्र ; कुंडी ; कोटमी . ( प्रा . कोलंब = भांडे ; का . कोळंवि - वे - बि = पोकळ नळी )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP